FM Nirmala Sitharaman | (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढता धोका लक्षात घेत घेण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली. तसंच त्यासाठी तब्बल 20 लाख कोटींचे आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात आले. या आर्थिक पॅकेजची तपशीलवार माहिती गेल्या 4 दिवसांपासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) देत आहेत. आज याचा शेवटचा टप्पा पार पडणार आहे. यासाठी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री अखेरची पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आज अर्थमंत्री कोणत्या घोषणा करणार याबाबत उत्सुकता आहे.

मागील 3 टप्पांमध्ये MSME सेक्टर, पगारदार वर्ग, शेतकरी, श्रमिक, स्थलांतरीत मजूर यांच्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर कोळसा व्यवसाय, खनिजे व्यवसाय, संरक्षण संसाधनांची निर्मिती, एअरस्पेस मॅनेजमेंट, MRO, अवकाश संशोधन क्षेत्र आणि अणू ऊर्जा या क्षेत्रांसाठी विशेष घोषणा करण्यात आल्या आहेत. (विमान व्यवसाय क्षेत्रातून प्रतिवर्षी 1000 कोटींचा नफा मिळवण्यासाठी होणार 'हे' बदल- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण)

ANI Tweet:

भारताने कोरोना बाधितांच्या संख्येत चीनला मागे टाकले असून देशातील कोरोना बाधितांचा आकडा 85 हजारच्या पार गेला आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस असून उद्यापासून 4.0 ला सुरुवात होईल. हा लॉकडाऊन वेगळ्या प्रकारचा असणार आहे. मात्र याचे स्वरुप आणि कालावधी लवकरच आपल्या समोर स्पष्ट होईल.