विमान व्यवसाय क्षेत्रातून प्रतिवर्षी 1000 कोटींचा नफा मिळवण्यासाठी होणार 'हे' बदल- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण
Finance Minister Nirmala Sitharaman (Photo Credits: ANI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (FM Nirmala Sitharaman) यांनी आज सलग चौथी पत्रकार परिषद घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेज विषयी यामध्ये माहिती दिली. आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat)  बनवण्यासाठी काही क्षेत्रांना आर्थिक पाठबळ देण्याच्या बाबत आज घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठ क्षेत्रात गुंतवणूक करण्यात येणार आहे. यापैकी एक क्षेत्र हे विमान व्यवसायाशी संबंधित असणार आहे. भारताची हवाई हद्द वापरासाठी सुरु करण्यापासून ते विमानाच्या भागांची दुरुस्ती ते देखभाल करण्यापर्यंत सर्वकाही देशातच करण्यासाठी काही महत्वाचे बदल आजच्या पत्रकार परिषदेतून मांडण्यात आले. या बदलानुसार आता होत असणारा 554  कोटींचा नफा हा प्रतिवर्षाकाठी 1000 कोटी होणार अशी अपेक्षा व्यक्त करत त्यानुसार प्लॅनिंग करण्यात आल्याचे सीतारामण यांनी म्हंटले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण  यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले महत्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विमान व्यवसायासाठी केल्या या घोषणा

-ग्राहकांचे हक्क, उद्योगाची जाहिरात आणि क्षेत्रात सुधारणांचे एक टॅरिफ पॉलिसी जाहीर केले जाईल

-विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि जतन यासाठी भारताला जागतिक केंद्र बनवायचे आहे. यानुसार एमआरओ साठी करसंरचना करण्यात येणार आहे.

- विमान आणि विमानाचे भाग याची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी 3 वर्षात 800 कोटी रुपयांवरून 2000 कोटी रुपयांवर गुंतवणूक केली जाईल.

-Airports Authority of India तर्फे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर ऑपरेशन आणि देखभाल दुरुस्तीसाठी 6 पैकी 3 विमानतळ देण्यात येतील.

-भारतीय हवाई जागेच्या वापरावरील निर्बंध कमी केले जातील जेणेकरून नागरी उड्डाण अधिक कार्यक्षम होईल.

- एकूण हवाई सेवेसाठी वर्षाकाठी 1000 कोटी रुपयांचा नफा येईल असे प्लॅन्स आहेत.

ANI ट्विट

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेमधून संरक्षण संसाधनांच्या सोबतच कोळसा व्यवसाय, खनिजे व्यवसाय, एअरस्पेस मॅनेजमेंट, MRO (देखभाल, दुरुस्ती आणि जतन), अवकाश संशोधन क्षेत्र (Space Research), अणु ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक करण्याबाबत सुद्धा महत्तवपूर्ण घोषणा करण्यात आल्या.