भवानी पेठेत एकाच इमारतीत 48 जणांना कोरोनाची बाधा; 16 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Darshana Pawar
|
May 16, 2020 11:58 PM IST
कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे नागरिकांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तर सरकारसमोरील आव्हानं वाढत आहेत. दरम्यान स्थलांतरीत मजूरांना घरी परतण्यासाठी श्रमिक ट्रेन्स सुरु केल्या असल्या तरी अनेक मजूर जीवावर उदार होऊन मिळेल त्या मार्गाने प्रवास करताना दिसत आहेत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून आजही उत्तर प्रदेशात मजूरांचा भीषण अपघात झाला. यात 23 जणांचा बळी गेला असून 15 जण जखमी झाले आहेत.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसच्या वाढता प्रभाव भारत देशही अनुभवत आहे. दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा चौथा टप्पा येत्या 2 दिवसांत सुरु होईल. परंतु, लॉकडाऊन 4.0 पूर्णतः वेगळ्या पद्धतीचा असणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र त्याचे स्वरुप आणि कालावधी लवकरच आपल्या समोर येईल.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना व्हायरसच्या संकटात मदत म्हणून भारताला व्हेंटिलेटर्स दान केले आहेत. कोविड 19 या अदृश्य शत्रूला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका लस तयार करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत असल्याचेही ट्रम्प म्हणाले. तसंच या कोरोना विरुद्धच्या लढाईत आम्ही भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या सोबत आहोत. आपण एकत्रितपणे या अदृश्य शत्रूवर मात करु असेही आश्वासक वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे.