Ahmedabad: 'माझ्या बायकोसोबत प्रेमसंबंध ठेव'; बॉसच्या विचित्र दबावामुळे अल्पवयीन मुलाची आत्महत्या
Representational Image (Photo Credits: File Image)

अहमदाबाद (Ahmedabad) येथील 19 वर्षीय युवकाच्या मृत्यूच्या पाच महिन्यांनंतर, त्याच्या मृत्यूचे गूढ उकळले आहे. स्वतःच्या बायकोशी ‘तसले’ संबंध प्रस्थापित करण्यास बॉसने सक्ती करत, निर्माण झालेल्या मानसिक दबावामुळे या युवकाने आत्महत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. हा दबाव टाकण्यासाठी बॉसने युवकाचा पगार अडवून ठेवला होता. या युवकाच्या सेलफोनवरील जुन्या मेसेजेसवरून या प्रकरणाचा छडा लावण्यात आला आहे. या प्रकरणी मृत युवक निखिल परमारचा (Nikhil Parmar) मालक आणि पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याअंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केले याबाबत हा गुन्हा दाखल झाला आहे. एफआयआरमध्ये म्हटले आहे की, मृत निखिल परमार ऑक्टोबर 2018 मध्ये वासना येथे एका फर्ममध्ये कामाला लागला होता. लग्नाच्या सजावटीसाठी गोष्टी पुरवणे निखीलच्या मालकाचा व्यवसाय होता. जॉबला दहा महिने उलटून गेल्यानंतर निखिलने आपण ही नोकरी सोडत असल्याचे आपल्या वडिलांना सांगितले. मालक आणि त्याची पत्नी दोघेही आपला मानसिक छळ करीत आहेत असे कारण निखीलने दिले होते.

त्यानंतर जुलै 2019 मध्ये निखीलला त्याच्या मालकाने पगार घेऊन जायला ये असा निरोप पाठवला. निखील त्याला भेटायला गेला असता, मालक त्याला राजस्थानच्या ट्रीपवर घेऊन गेला. त्यानंतर मालकाने निखीलच्या वडिलांना फोन करून निखीलने आत्महत्या केली असल्याचे कळवले. निखीलच्या मृत्यूच्या तीन महिन्यानंतर त्याच्या भावंडांनी त्याचा फोन व्यवस्थित चेक केला, त्यावेळी जे मेसेजेस त्यांना आढळले ते पाहून त्यांना धक्का बसला. (हेही वाचा: लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यास मुलाला वडीलांचा विरोध, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या)

बॉसने निखीलला आपल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध निर्माण करण्यास भाग पाडले, जेव्हा हे दोघे प्रेमात पडले तेव्हा बॉसने निखीलला आपल्या पत्नीपासून दूर जाण्यास सांगितले. जेव्हा ही गोष्ट निखीलने मालकाच्या पत्नीला सांगितली तेव्हापासून तिने निखीलला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे बॉस आणि त्याच्या पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळूनच निखीलने अत्न्हात्या केली होती.