फक्त म्हणायला आपल्या देशातून, समाजातून अस्पृश्यता खूप पूर्वी संपली आहे. परंतु बर्याचदा ती अजूनही अस्तित्वातअसल्याचा अनेक घटना आपल्याला दिसतात. आंध्र प्रदेशातील गुंटूर (Guntur) जिल्ह्यातील अनंतवरम गावातही असेच काहीसे घडले आहे. येथे तेलगू देसम पक्षाच्या (TDP) नेत्यांनी वायएसआर कॉंग्रेसच्या आमदार वूंदावली श्रीदेवी (Vundavalli Sridevi) यांना त्या केवळ अनुसूचित जातीच्या (Dalit MLA) असल्याने गणेश मंडपात प्रवेश दिला नसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून, समाजातून या गोष्टीविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
एएनआय ट्विट -
#WATCH Guntur: TDP leaders stop YSRCP MLA Vundavalli Sridevi from entering a Ganesh Pandal in Ananthavaram village, allegedly because she belongs to Dalit community. #AndhraPradesh (02.09.19) pic.twitter.com/X0o1QYg9Px
— ANI (@ANI) September 3, 2019
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश चतुर्थीनिमित्त काल वूंदावली श्रीदेवी मंडपात प्रवेश करू लागल्या तेव्हा, टीडीपी लोकनेत्यानी सांगितले की, त्या जर गणेश पूजामध्ये सहभागी झाल्या तर गणपती अपवित्र होईल. त्यानंतर वूंदावली श्रीदेवी यांच्या मंडपांमध्ये प्रवेश करण्याबाबत प्रचंड विरोध झाल्याने शेवटी श्रीदेवी गणपतीचे दर्शन न घेतला तिथून निघून गेल्या. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, जेव्हा वूंदावली श्रीदेवी मंडपात प्रवेश करू लागल्या तेव्हा टीडीपी नेते व समर्थक यांनी त्यांना प्रचंड विरोध केला. हे प्रकरण शेवटी मारामारी पर्यंत पोहचले होते. (हेही वाचा: हैदराबाद येथील गणेश मूर्तीच्या उंचीत वाढ, यावर्षी थेट ६१ फूट)
परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मधे पडावे लागले. त्यानंतर घडलेल्या प्रकरणाबाबत श्रीदेवी यांनी स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये एक तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, वाईएसआर कॉंग्रेसच्या नेत्यांनी सोमवारी रात्री या घटनेचा निषेध म्हणून आपला विरोध प्रदर्शित केला. भारताच्या राजकारणात आणि समाजकारणात ही घटना अतिशय निंदनीय ठरत आहेत.