गुजरात मधील सुरत येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका महिलेने संपूर्ण गावकऱ्यांच्या समोर तरुणीचे केस कापल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा सध्या व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. तरुणीला काही महिलांनी पकडले असून तिचे बळजबरीने केस कापले जात असल्याचे त्यामध्ये दिसून येत आहे. पीडिता तरुणी स्वत:चा बचाव करण्यासाठी ओरडत असल्याचे ही कळते पण कोणीही तिच्या मदतीसाठी आले नाही.(Rajasthan Shocker: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची हत्या, पत्नीसह तिच्या 2 प्रियकरांना अटक)
पलसाना जिल्ह्यातील तातीथईया गावातील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे. एका महिलेने युवतीचे केस कापले. तेव्हा तरुणीने मदतीसाठी आरडाओरड केली पण कोणीही पुढे आले नाही. महिलांनी तिला ऐवढे घट्ट पकडले होते की, ती काहीच करु शकत नव्हती. तरुणीचा जीव वाचवण्याऐवजी तिचा व्हिडिओ बघ्यांकडून शूट केला जात होता. काही जण या प्रकारावर हसत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना पोलिसांना कळली. पोलिसांनी पीडित तरुणीने असे म्हटले की, जबाब नोंदवल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला जाईल असे म्हटले आहे.
पोलिसांनी मुख्य आरोपी महिलेसह अन्य काही जणांना सुद्धा ताब्यात घेतले आहे. ज्यामध्ये दोन पुरुषांचा सुद्धा समावेश आहे. सुरतचे एसपी ग्रामीण उषा राडा यांनी म्हटले की, महिलेला संशय होता तरुणीचे तिच्या नवऱ्यासोबत विवाहबाह्य संबंध आहेत. याच संशयावरुन महिलेने तरुणीला पकडले आणि तिचे केस कापले. महिलेचे याआधी सुद्धा तरुणीसोबत भांडण झाले होते.(Chennai: कोल्ड्रिंक प्यायल्यानंतर गुदमरला श्वास, उपचाराआधीच अल्पवयीन मुलीचा मृत्यू)
भांडणानंतर तरुणी मध्य प्रदेशात आपल्या घरी गेली होती. पण ती पुन्हा परत आल्याचे महिलेला कळले. तेव्हा तिने तरुणीला पकडले आणि तिला मारहाण करत तिचे केस कापले. जेव्हा महिलेकडून तरुणीसोबत गैरवर्तवणूक केली जात होती तेव्हा स्थानिकांकडून त्या घटनेसाठी समर्थन केले जात होते. तसेच तेथे असलेल्या एका कपड्याच्या दुकानातील मालिकाने तरुणीचे केस कापण्यासाठी कैची सुद्धा दिली.