कोल्ड्रिंक (Cold Drink) प्यायल्यानंतर श्वास गुदमरल्याने एका 13 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना 3 ऑगस्ट रोजी चेन्नईच्या (Chennai) बेसंतनगर (Besant Nagar) येथे घडली आहे. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाकडून (Food Safety Department) बुधवारी शोलावरममधील संबंधित कोल्ड्रिंक मॅन्युफॅक्चरिंग युनिट तात्पुरते बंद करण्यात आले आहे. तसेच मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून कोल्ड्रिंक्सच्या 40 बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यांचे नमुने घेण्यात आले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी शास्त्रीनगर पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी आपल्या कुटुंबासोबत ओडाईकुप्पम भागात राहत होती. तसेच कल्पकम येथील सरकारी शाळेत इयत्ता सातवीत शिकत होती. कोविड -19 साथीच्या आजारामुळे ते तिच्या आजीच्या घरी राहण्यासाठी बेसंत नगरला आली होती. ती मुलीला अस्थमाच्या आजाराने ग्रस्त होती. तसेच डॉक्टरांनी तिला शीतपेये पिण्यास मनाई केली होती. मात्र, 3 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास शेजारच्या दुकानातून तोगिटो कोलाच्या दोन बाटल्या विकत घेऊन आली. घरात जाण्यापूर्वी तिने एका बाटलीमधील थोडे कोल्ड ड्रिंक प्यायली. हे पाहिल्यानंतर तिच्या मोठ्या बहीणीने तिच्या हातातून कोल्ड्रिंकची बॉटल हिसकावून घेतली. मात्र, थोड्या वेळाने जेव्हा तिची मोठी बहीण घराबाहेर गेली. त्यानंतर तिने बाकीचेही कोल्ड ड्रिंक सेवन केले. त्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या आणि ती तिथेच जमिनीवर कोसळली. शेजाऱ्यांनी तिला अड्यार येथील पीएम रुग्णालयात नेण्यास मदत केली. मात्र, तिथे गेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषीत केले आहे. हे देखील वाचा-Bihar: दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षाच्या मुलीची बलात्कारानंतर निर्घृण हत्या; उजवा डोळा बाहेर काढला, बोटेही ठेचली
या घटनेनंतर शास्त्रीनगर पोलिसांनी मृत मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. शवविच्छेदनाच्या अहवालानुसार, कोल्ड्रिंक प्यायल्यामुळे श्वास गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सध्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी शोलावरमधील कोल्ड्रिंकचे मॅन्युफॅक्चरिंग युनिट बंद केले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील चौकशी करत आहेत.