सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) माजी मुख्य न्यायाधीश (Former Chief Justice) रंजन गोगोई (Ranjan Gogoi) यांना कोरोना व्हायरसची (Coronavirus) लागण झाल्याचे खोटे वृत्त समोर आले होते. दरम्यान गोगोई यांना कोरोना व्हायरसची लागण झाली नसल्याचे समोर येत आहे. गोगाई यांनी एका पोर्टलशी बोलताना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान न्यायाधिश रंजन गोगोई यांनी अयोध्येतील राम मंदिर प्रकरणावर ऐतिहासिक निर्णय दिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अयोध्या राम मंदिराचा प्रश्न निकाली लागला होता. यात गोगोई यांच्या अध्यक्षेखाली राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने जागा दिली होती. त्याचबरोबर बाबरी मशिद बांधण्यासाठी देखील 5 एकर जागा देण्यात आली होती.
पहा ट्विट:
After reports surfaced that former Chief Justice of India and Rajya Sabha MP, Ranjan Gogoi tested positive for #COVID19, Justice Gogoi confirms to @barandbench that the "news is incorrect." pic.twitter.com/5GDzGyKSaP
— Bar & Bench (@barandbench) August 4, 2020
देशातील कोरोना व्हायरसचे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना देखील कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे. त्यांच्यावर गुरुग्राम येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. याची माहिती खुद्द अमित शाह यांनी सोशल मीडियावर ट्विट करत दिली होती. अमित शाह यांच्या व्यतिरिक्त केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया, तामिळनाडूचे गव्हर्नर बलवाली लाल पुरोहित यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना देखील कोरोना व्हायरसची बाधा झाली होती. मात्र कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आजच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.