
विवाहबाह्य संबंधांत प्रेमी ने Intimate Photos ऑनलाईन शेअर केल्याने गृहिणी ने गळफास घेत आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या पोलिस या प्रकरणी जवळच्या लोकांची चौकशी करत आहेत. ही घटना त्रिपुरा मधील असून मृत महिलेच्या पतीने आरोपीविरुद्ध तिची बदनामी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. दुर्गजॉय नगर परिसरामध्ये राहत्या घरी ही महिला मृतावस्थेमध्ये आढळली.
TOI च्या रिपोर्ट्स नुसार, सध्या पोलिस मृत महिलेच्या कुटुंबातील, मित्र मंडळींची चौकशी करत आहे. या आत्महत्या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही अटक झालेली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या कुटुंबाचे स्टेटमेंट रेकॉर्ड केले आहे. नक्की वाचा: Odisha Shocker: अवैध संबंधाचे रहस्य झाले उघड; पत्नीने प्रियकरासह पतीची केली हत्या, मृतदेह घरातच पुरला .
सूत्रांच्या माहितीनुसार, महिलेचे लग्नानंतर विवाहबाह्य संबंध होते. हा प्रेमी त्यांच्याच भागात राहत होता. त्याने दोघांमधील काही नाजूक क्षण फोटो च्या स्वरूपात कैद केले होते. मात्र ही महिला या संबंधांमधून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये होती. मात्र प्रेमीने त्यांचे फोटोज सोशल मीडीयात पोस्ट केले. सामाजिक कलंकाच्या भीतीने महिलेने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. तिच्या पतीने आरोपीविरुद्ध तिची बदनामी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तक्रार दाखल केली, असेही पोलिसांनी सांगितले आहे.