Stock Market | | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

शेअर बाजारात आज मोठी पडझड (Stock Market Crashed) पाहायला मिळाली. प्रामुख्याने एकूण अशियाई शेअर बाजारातच मोठी घसरण झाल्याने त्याचा फटका भारतीय शेअर बाजारालाही मोठ्या प्रमाणावर बसला. मुंबई शेअर बाजारात आज (17 डिसेंबर) सकाळपासूनच सेन्सेक पडझड होताना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स तब्बल 700 अकांनी कोसळला. तर निफ्टीमध्येही 200 अंकांची घसरण पाहायला मिळाली. शेअर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांमध्ये चिंतेचे (Investors Hit Hard) वातावरण आहे.

गुरुवारी शेअर बाजार बंद होताना शेवटच्या सत्रात सेन्सेक्स 319.82 अकांची घसरण होऊन 57,581.32 वर स्थिरावला होता. तर, निफ्टीही 0.53 टक्के म्हणजे 91 अकांची घसरण होऊन निफ्टी 17,157.40 अंकांवर बंद झाला. शुक्रवारी सकाळी बाजार सुरु झाला तेव्हा अशियायी शेअर बाजारात झालेल्या घसरणीचा फटका बसून सेन्सेक्स आणखी घसरला. सेन्सेक्समध्ये तब्बल 700 अंकांची घसरण झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर घसरण झाल्याने भारतीय शेअर बाजारातही पडझड पहायला मिळत आहे. दरम्यान, पुढच्या काही काळात शेअर बाजार वधारण्याची शक्यता अभ्यास व्यक्त करत आहेत. (हेही वाचा,Stock Market: इतिहासात पहिल्यांदाच BSE सेन्सेक्स 50,000 पार, निफ्टी 14,700 अंकाच्याही पुढे )

प्राप्त माहितीनुसार आज, बाजारात सर्वाधिक फटका बसलेल्या शेअर्समध्ये टायटन, एचयूएएल, मारूती, एशियन पेंट्स आणि इंडसलँड बँक यांचा समावेश आहे. तर, इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्रा हे शेअर्स काही प्रमाणात वधारले आहेत. शेअर बाजरातील चढ उतार पाहता गुंतवणुकदारांनीक काळजीपूर्वक गुंतवणूक करावी, असा सल्ला शेअर मार्केटचे अभ्यासक देतात.