PM Narendra Modi meditates at a holy cave in Uttarakhand (Photo Credits: ANI/File

नरेंद्र मोदींनी  (Narendra Modi) काल केदारनाथ (Kedarnath)  येथे जाऊन दर्शन घेतल्यावर साधारण एक किमी अंतरावर स्थित एका गुहेत रात्रभर ध्यानधारणा केली. या बाबत काही फोटो सध्या सोशल मीडियावर देखील पाहायला मिळतायत. ही गुहा (Cave)  म्हणजे काही सर्वसामान्य नसून मोदींच्या सुरक्षा व सोयीच्या हेतूने विशेष अद्ययावत स्वरूपात तयार करण्यात आल्याची माहिती माध्यमांना मिळत आहे. या गुहेत रात्रभर ध्यान केल्यावर आज सकाळी मोदी बद्रीनाथ (Badrinath)  येथे दर्शन घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

नरेंद्र मोदींसाठी हायटेक गुहा

केदारनाथ मंदिरापासून काहीच अंतरावर समुद्रसपाटीपासून तब्बल 12 हजार फूट उंचीवर एक भला मोठा दगड कापून ही गुहा तयार करण्यात आली होती. या गुहेत पुरेसा प्रकाश येण्यासाठी व समोरच असलेल्या केदारनाथ मंदिराचे सुंदर रूप पाहण्यासाठी एक चौकोनी खिडकी व त्यावर साधारण 10 फूट वर छप्पर अशी गुहेची रचना आहे. गुहेला जोडूनच शौचालय बांधण्यात आले होते. या गुहेत आराम करण्यासाठी एक छोटा पलंग व ध्यान करण्यसाठी मोकळी जागा सोडण्यात आली आहे. याशिवाय सुरक्षा कारणासाठी गुहेत व गुहेबाहेर सीसीटीव्ही कॅमेराची जोडणी करण्यात आली होती अशी माहिती TOI च्या वृत्तात सादर केली आहे. केदारनाथ नंतर आज नरेंद्र मोदी यांनी घेतले बद्रीनाथ मंदिरात दर्शन

नेहरू पर्वतारोहण इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी TOI ला दिलेल्या माहितीनुसार ही अद्ययावत गुहा तयार करण्यासाठी मोदींच्या केदारनाथ दौऱ्याच्या आधी कित्येक महिन्यापासून सुरवात करण्यात आली होती. दगडाच्या कापणीपासून ते बांधणीपर्यंत तसेच गुहेच्या अंतर्गत वीज, पाणी अशा सुविधा तयार करून मागच्या महिन्यात या गुहेचे काम पूर्ण झाले . यानंतर मोदींच्या आगमनाने या गुहेचे उदघाटन करण्यात आले. यापुढे सर्वसामान्यांसाठी देखील प्रतिदिन 999 रुपयात ही गुहा उघड करण्यात येईल.

दरम्यान, आज सकाळी गुहेतून बाहेर आल्यावर मोदींनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यात "या ठिकाणाशी आपले खूप जुने संबंध आहेत, इथे येऊन गुहेत ध्यान करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो" अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच "2013 ला केदारनाथ परिसरात आलेल्या संकटाच्या वेळी मी माझ्या परीने शक्य तेवढे मदत कार्य करण्याचे प्रयत्न केले होते, इथली भौगोलिक परिस्थती पाहता विकासकामे करण्याची संधी कमी काळ मिळते पण त्याचाही वापर करून या पवित्र परिसराच्या विकासासाठी नवे प्रकल्प येत्या दिवसात तयार करण्यात येतील" असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

ANI ट्विट 

केदारनाथ मंदिरातील पुजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार मोदींचा केदारनाथ दौरा व त्यातही गुहेत ध्यान करण्याचा निर्णय भाविकांना इथे येण्यासाठी प्रेरित करणारा ठरला