दक्षिण भारताला दहशतवादी हल्ल्याचा धोका; सर क्रिक येथे आढळलल्या अज्ञात बोटी: लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी
S.K. Saini (Photo Credits: ANI)

भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल एसके सैनी (LT. General S. K. Saini) यांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या दक्षिण भागाला (Southern India) दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर क्रिक (Sir Creek) या भागात काही सोडून दिलेल्या अज्ञात बोटी आढळून आल्या या संशयित बोटींना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना सैनी यांनी दक्षिण भारतावर दहशवादी हल्ला होण्याची काही चिन्हे आहेत अशी माहिती दिली तर सोबतच असे काही झाल्यास या कारवायांना उलथवून लावण्यास भारतीय सैन्य समर्थ आहे असा विश्वास देखील सैनी यांनी बोलून दाखवला. (पाकिस्तानचे नापाक कृत्य; जैश-ए-मोहम्मद प्रमुख मसूद अझहरची तुरुंगातून छुप्या रीतीने सुटका, भारताविरुद्ध कट रचण्याची योजना)

ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासूनच तामिळनाडू मधील महत्वाच्या भागात दक्षतेचा इशारा देण्यात आला होता. श्रीलंकेतून समुद्री मार्गाने दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाचे सहा सदस्य राज्यात शिरल्याची शक्यता देखील वर्तवण्यायात आली होती. कोयम्बतूर सह काही प्रमुख शहरात संशयास्पद पद्धतीने काही माणसे वावरताना दिसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत होते, आणि आता याच पार्शवभूमीवर सर क्रिक येथे सापडलेल्या संशयास्पद बोटींमुळे हल्ल्याची शक्यता आणखीनच तीव्र होत आहे.

ANI ट्विट

दरम्यान याबाबत केरळ पोलीस महासंचालक लोकनात बहेरा यांनी माहिती देत सांगितले की, भारतीय सेनेकडून दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्याचेही आदेश दिले गेले आहेत.त्यामुळे अशाप्रकारच्याकोणत्याही हल्ल्याला उत्तर देण्यास भारत सज्ज आहे असेही ते म्हणाले.