सामान्य नागरिकांना आणखी एक झटका! साबणांसह डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ
साबण आणि डिटेर्जेंटच्या किंमतीत वाढ (Photo Credits-Twitter)

Detergent Price Hike: सामान्य नागरिकांवर दिवसागणिक महागाईचा बोझा वाढताना दिसून येत आहे. पेट्रोल-डिझेल आणि भाज्यांचे दर वाढल्यानंतर आता डिटेर्जेंटसह साबणाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे अंघोळ करणे आणि कपडे धुण्याच्या डिटेर्जेंटसाठी नागरिकांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. HUL आणि ITC ने साबण आणि डिटेर्जेंटच्या किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.(नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसणार, लवकरच Insurance Premium मध्ये होणार वाढ)

HUL ने 3.4 टक्के ते 21.7 टक्क्यांपर्यंत किंमतीत वाढ केली आहे. त्यानुसार व्हिल, रिन बार आणि लक्सच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर ITC कडून फियामा साबण्याच्या किंमती 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. या व्यतिरिक्त Vivel वर 9 टक्के आणि Engage च्या डिओवर 7.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.मनी कंट्रोलच्या रिपोर्ट्सनुसार FMCG कंपनीने इनपुट कॉस्टमध्ये सुद्धा वाढ झाल्याने साबण आणि सर्फची किंमत अधिक झाली आहे.(7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना 2022 मध्ये मिळू शकते खुशखबर! वेतनात भरघोस होणार वाढ)

तर हिंदुस्तान युनिलिव्हरने व्हिलच्या 1 किलो पॅकेटसाठी 3.4 टक्क्यांनी वाढ केली असून याच्या दरात 2 रुपये अधिक द्यावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त 500 ग्रॅम असणाऱ्या पॅकसाठी 28 रुपयांऐवजी आता 30 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचसोबत रिन साबणाच्या 250 ग्रॅम पॅकच्या किंमतीत 5.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर लक्सच्या 100 ग्रॅम पॅकच्या किंमती 21.7 टक्क्यांनी वाढवल्या आहेत. TC ने Fiama च्या साबणात 10 टक्के वाढ केली आहे. Engage डिओडोरंटच्या 150ml बाटलीच्या किमतीत 7.6 टक्के आणि Engage परफ्यूमच्या 120ml बाटलीच्या किमतीत 7.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे.