Health Insurance (Photo Credits-Twitter)

येत्या दिवसात खर्चांसंदर्भात दिलासा मिळेल अशी अपेक्षा जर तुम्ही करत असाल तर थांबा. कारण नुकत्याच काही दिवसांपूर्वी नव्या वर्षात कपडे, चप्पल, टेक्सटाइल्ससह काही गोष्टींच्या किंमतीत वाढ करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. अशातच आता आणखी एक झटका नागरिकांना बसणार आहे. तो म्हणजे लवकरच इंश्योरन्स प्रीमियमच्या (Insurance Premium) किंमतीत वाढ केली जाणार आहे. या संदर्भात कंपनीने तयारी करण्यास ही सुरुवात केली आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की, तुमच्या हेल्थ इंश्योरन्सचे प्रीमियमच्या किंमतीत वाढ होणार आहे? तर जाणून घ्या येथे अधिक.

विमा कंपन्या आपल्या प्रीमियमच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. अशातच अंदाज लावला जात आहे की, ही वाढ 25 ते 40 टक्क्यांदरम्यान असू शकते. त्याचसोबत आरोग्य आणि जीवन विम्यासाठी या नव्या किंमती लागू होऊ शकतात. खरंतर कोरोनाच्या काळात काही लोकांनी आपला जीव गमावला त्यावेळपासून लोकांनी इंश्योरन्स काढण्यासंदर्भात अधिक जागृकता निर्माण झाली आहे.

Policy Bazar यांच्यानुसार, कोरोना व्हायरसनंतर विम्याबद्दल अधिक माहिती मिळवणाऱ्यांची संख्या 7 पट अधिक वाढली आहे. यापूर्वी फक्त 10 टक्के लोक इंश्युरन्स काढण्यासंदर्भात विचार करत होते. परंतु आता 71 टक्के लोक विमा काढण्यात आपला कल दाखवत आहेत.(Garib Kalyan Anna Yojana: मोदी सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत वाढवली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय)

इंश्योरन्स समाधानचे को-फाउंडर यांच्या मते, वर्षाभरात जेथे कंपन्यांकडे आधी 3-4 हजार डेथ क्लेम येत होते. परंतु कोरोनाच्या काळात वर्षभरातच 20 हजार डेथ क्लेम आले. यामुळेच ही वाढ रि-इंश्योरन्स कंपन्यांना आपण तोट्यात असल्याचे वाटत आहे.

रि-इंश्योरन्स कंपनीबद्दल सोप्प्या शब्दात जाणून घ्यायचे असेल तर अशी कंपनी जी आपल्या इंश्योरन्सच्या कंपनीचा प्रीमियम देऊन आपल्या इंश्योरला रि-इंन्शोर करते. या कंपन्या मोठ्या कंपन्यांसोबत आपल्या इंश्योरन्सवर स्वत:साठी इंन्शोरन्स खरेदी करतात. त्यामुळे जेव्हा तुम्ही सुद्धा इंश्योरन्स क्लेम करता तेव्हा रि-इंश्योरन्स कंपनी आपल्या इंन्शोरन्स कंपनीला पैसे देते.