स्मृती ईराणी आणि अनुराग कश्यप (Photo Credits: Twitter/ Instagram)

Anurag Kashyap #MeToo Controversy: चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर नुकत्याच एका तेलगू अभिनेत्रीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे. तर सोशल मीडियात खुप लोकांनी ट्वीट करत मी टू कॅम्पेन संबंधित चर्चा अधिक वेगाने सुरु झाली आहे. अनुरागवर आरोप लावत अभिनेत्रीने पंतप्रधानांच्या कार्यालयालासुद्धा ट्विटरवर टॅग केले आहे. त्यामध्ये तिने त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. हा वाद समोर आल्यानंतर आता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी हिने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

रिपब्लिक टीवीवर या प्रकरणी चर्चा सुरु असताना स्मृती इराणी यांनी म्हटले की, एका संविधानाच्या पदावर असून जी राष्ट्रीय महिला आयोगाची देखरेख करते. एनसीडब्लुच्या एका सार्वजनिक विधानात म्हटले की, या विशिष्ट प्रकरणात हस्तक्षेप करणे हे घटनात्मक नाही. ते योग्य नसेल.(FIR Against Anurag Kashyap: अनुराग कश्यप च्या विरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप लावणारी तेलगु अभिनेत्री उद्या पोलिसात तक्रार दाखल करणार)

दरम्यान, पीडित अभिनेत्रीने आता राष्ट्रीय महिला आयोगाची चेअरपर्सन रेखा शर्मा यांनी या प्रकरणी असे म्हटले की, याची विस्तृतपणे तक्रार दाखल करावी. त्यानंतरच हे प्रकरण कायद्यानुसार घेतले जाईल.(Anurag Kashyap Accused Of Sexual Exploitation: अनुराग कश्यपने स्वत:वरील लैंगिक शोषणाच्या आरोपावर सोडलं मौन; म्हणाला 'थोडी तरी मर्यादा ठेवा मॅडम')

दुसऱ्या बाजूला अनुराग कश्यप याने त्याच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे म्हणत ते फेटाळून लावले आहेत. त्याने असे म्हटले की, त्याला शांत आणि धमकवण्याचा हा एक प्रकार आहे. याबद्दल त्याने आपल्या वकीलांच्या माध्यमांतून एक अधिकृत विधान सुद्धा जाहीर केले आहे.

या प्रकरणी पीडित अभिनेत्रीने आपले नाव घेतल्याने अभिनेत्री ऋचा चड्ढा सुद्धा नाराज आहे. सोशल मीडियात तिने आपल्या वकीलाच्या मदतीने तिचे मत व्यक्त केले आहे.