Anurag Kashyap (Photo Credits-Twitter)

अनुराग कश्यप (Anurag Kashyap) वर एका तेलुगु अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा (Sexual Assault) आरोप केला आहे. अनुराग कश्यप याने माझ्यासोबत जबरदस्ती करत खूप वाईट वागणूक दिली असल्याचे या अभिनेत्रीने एका व्हिडिओ मध्ये म्हंंटले होते यावरुनच आज एका नव्या वादाला तोंंड फुटले आहे. बॉलिवूड मधील अनेक मंंडळी या प्रसंगी अनुराग च्या पाठिशी उभी राहत आहेत तर ट्विटर वर नेटकरी मात्र #ArrestAnurag, #Metoo सारखे हॅशटॅग व्हायरल करत आहेत. याबाबत एक नवे अपडेट हाती येत आहे. प्राप्त माहितीनुसार या अभिनेत्रीने आता अनुरागच्या विरुद्ध थेट पोलिसात जाऊन FIR दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

अभिनेत्रीचे वकील नितीन सातपुते यांंनी सांंगितल्याप्रमाणे, अनुराग च्या विरुद्ध आता अधिकृत तक्रार दाखल करायला तयार आहे, आम्ही उद्या ओशिवारा पोलिस स्थानकात जाऊन कायदेशीर रीतसर तक्रार दाखल करणार आहोत असेही सातपुते यांंनी सांंगितले आहे.(अनुराग कश्यप ने कंंगनाला दिला चीन शी लढण्याचा सल्ला, कंंगनाने त्याचीच अक्कल काढत दिले 'हे' उत्तर)

ANI ट्विट

दरम्यान, या सर्व प्रकरणात अनुराग ने मात्र संयमी प्रतिक्रिया दिलेली आहे, अनुरागने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्यावरील सर्व आरोप निराधार असल्याचं म्हटलं आहे. मला गप्प करण्यासाठी येवढं खोट बोललं जात आहे की, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रियांनाही यात ओढण्यात आलं आहे. थोडी तरी मर्यादा राखा. तुम्ही लावलेले सर्व आरोप निराधार आहेत.'असे सांंगत त्याने आज दुपारीच एक ट्विट केले होते. काही दिवसांंपुर्वी अनुराग ने कंंगना च्या विरुद्ध ट्विट करत तिच्याशी सुद्धा पंगा घेतला होता.