धक्कादायक! हॉस्पिटल चे बील भरायला पैसे नाहीत म्हणुन पोटच्या नवजात बाळाला 1 लाखात विकलं, वाचा सविस्तर
Baby (Photo Credits; Pixabay) (Representational image Only)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा (Agra) येथील दलित जोडप्याने हॉस्पिटल चे बिल भरण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्या नवजात बाळाला रुग्णालयात 1लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार सध्या चर्चेत आहे. रुग्णालयाने हा दावा फेटाळून या जोडप्याने बाळ त्यांना दत्तक देण्यासाठी दिलेले आहे असे म्हंंटलेय, गेल्या आठवड्यात नवजात आई बबीता हिचा रुग्णालयात सी-सेक्शन झाला. या प्रक्रियेसाठी 30,000 रुपये खर्च आला आणि तिच्या औषधांची किंमत 5 हजार रुपये होती.बबिताचा पती शिव चरण या रिक्षाचालकाकडे रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी पैसे नव्हते. हे बिल भरण्याला पर्याय नसल्याने या जोडप्याने मुलाला 1 लाख रुपयात विकले असा आरोप केला जात आहे. लज्जास्पद! जन्मदात्या आईने 10,000 रुपयांसाठी केली अवघ्या 15 दिवसांच्या पोटच्या मुलीची वेश्या व्यवसायाला विक्री

प्राप्त माहितीनुसार, 24 ऑगस्ट रोजी बबिताने एका मुलाला जन्म दिला. यानंंतर हा सगळा बिलाचा गोंंधळ झाला, अशावेळी रुग्णालयाच्या सूचनेनुसार लिहु वाचु न शकलेल्या या जोडप्याने सर्व कागदपत्रांवर अंगठा ठसा दिला. त्यांना डिस्चार्ज पेपर्स मिळालेले नाहीत मात्र रुग्णालयाने या दाम्पत्याला 1 लाख रुपये दिले आणि बाळ घेऊन गेले असा आरोप आहे. शेजारणीशी होणाऱ्या वादातून 4 वर्षांच्या मुलाची हत्या; अंधेरी येथील महिला अटकेत

दुसरीकडे हॉस्पिटलच्या माहितीनुसार, बाळाला दत्तक घेण्यास सोडण्यात आले आहे. जेपी हॉस्पिटलच्या मॅनेजर सीमा गुप्ता म्हणाल्या, हे दावे चुकीचे आहेत. आम्ही त्याला आपल्या मुलाचा त्याग करण्यास भाग पाडले नाही. त्याने स्वत: च्या मर्जीने केले. पालकांनी स्वाक्षरी केलेल्या लेखी कराराची एक प्रत माझ्याकडे आहे. टाइम्स ऑफ इंडिया च्या वृत्तानुसार, जिल्हा न्यायदंडाधिकारी प्रभू एन सिंग यांनी यात सहभागी असलेल्या लोकांविरूद्ध योग्य चौकशी केली जाईल असा विश्वास दर्शवला आहे.

धक्कादायक: मांत्रिकाच्या नादाला लागून वडिलांनी केली आपल्या 5 मुलांची हत्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

दरम्यान, शिव आणि बबिता हे 5 मुलांंचे पालक असून ते शंभू नगरातील भाड्याच्या घरात राहतात. शिव यांचा मोठा मुलगा शू कारखान्यात मजूर म्हणून काम करायचा पण कोरोनामुळे कारखाना बंद झाल्यानंतर तो बेरोजगार झाला आहे.