Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi's Mental Age: 'त्यांचे वय 50 वर्षे बुद्धी मात्र पाच वर्षांची' शिवराज सिंह चौहान यांची राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका (Watch Video)
Shivraj Singh Chouhan, Rahul Gandhi | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Election 2023) चा प्रचार ऐन रंगात आला आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. मध्य प्रदेशचे मख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Shivraj Singh Chouhan On Rahul Gandhi) यांच्यावर बुधवारी (26 एप्रिल) सडकून टीका केली. ते कर्नाटकमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान बोलत होते. शिवराज सिंह चौहान म्हणाले, राहुल गांधी ह सध्या 50 वर्षांचे आहेत. पण त्यांचे मानसिक वय पाच आहे. वृत्तसंस्था एएनआयने शिवराज सिंह यांचा राहुल गांधींवर टीका करतानाचा एक व्हिडिओही आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

शिवराज सिंह चौहान राहुल गांधी यांच्यावर टीका करताना पुढे म्हटले की, ते जनतेला जे काही आश्वासन देतात ते कधीच पूर्ण करत नाहीत. या आधीच्या निवडणुकीत ते म्हणाले आम्ही बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये भत्ता देऊ. त्यांच्या अश्वासनाला जनतेने प्रतिसाद दिला नाही. त्यांना आर्धीच सत्ता मिळाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी म्हणाले होते, काँग्रेस विसर्जित करा. पंडीत नेहरु यांनी ऐकले नाही. पण राहुल गांधी यांनी विडा उचलला आहे. काँग्रेसला विसर्जित केल्याशिवाय राहुल गांधी स्वस्त बसणार नाहीत. (हेही वाचा, HD Kumaraswamy: जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी रुग्णायलात दाखल; थकवा जाणवल्याने उपचार सुरु; प्रकृती स्थिर)

गेल्या महिन्यात लोकसभा खासदार म्हणून अपात्रतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरल्याबद्दल शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्ला चढवला. शिवराज म्हणाले की, गांधी हे ५० वर्षांचे आहेत पण त्यांचे मानसिक वय अवघे पाच आहे. सिंह म्हणाले की, राहुल गांधींना 'काय बोलावे' हेच कळत नाही.

व्हिडिओ

दरम्यान, कर्नाटक राज्यात 10 मे रोजी होणार्‍या निवडणुकांच्या तयारीत असताना कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनीही आपापल्या पक्षांना आपले कर्तव्य बजावण्यासाठी स्टार प्रचारक उभे केले आहेत. मतमोजणी 13 मे रोजी होणार आहे.