Karnataka Assembly Election 2023: जेडी(एस) नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी (HD Kumaraswamy Admitted To Hospital) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना थकवा आणि सामान्य अशक्तपणा आणि इतर काही लक्षणे जाणवू लागली होती. वैद्यकीयदृष्ट्या त्यांची प्रकृती स्थिर आहेत. लवकरच ते बरे होतील, असे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाने रविवारी (23 एप्रिल) सांगितले. कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्षाचे नेते प्रचारासाठी स्वत:ला झोकून देत आहेत. एचडी कुमारस्वामी हे देखील प्रचारात सहभागी आहेत. प्रचारादरम्यानच 63 वर्षीय कुमारस्वामी यांना ताप आल्याने डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता. कुमारस्वामी यांच्यावर नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती.
एच डी कुमारस्वामी यांना 22 एप्रिल 2023 रोजी संध्याकाळी मणिपाल हॉस्पिटल, ओल्ड एअरपोर्ट रोड बेंगळुरू येथे दाखल करण्यात आले. कुमारस्वीमी यांच्यावर डॉ. सत्यनारायण म्हैसूर यांच्या देखरेखीखाली उपचार करण्यात आले. कुमारस्वामी यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर हॉस्पिटलने एक निवेदन जारी केले. या निवेदनात म्हटले आहे की, कुमारस्वामी यांना थकवा आणि सामान्य अशक्तपणाच्या लक्षणांसह इतर काही लक्षणे आढळून आली. आरोग्याशी संबंधित वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्याननुसार त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कुमारस्वामी वैद्यकीयदृष्ट्या स्थिर आहेत आणि त्यांना आरामही पडत आहे, असे रुग्णालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ट्विट
Karnataka | JD(S) leader HD Kumaraswamy admitted to a private hospital after he complained of fever: Office of HD Kumaraswamy
(file pic) pic.twitter.com/KJBgb15UkG
— ANI (@ANI) April 22, 2023
एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकात 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभरात JD(S) दौरे काढत आहेत. ते उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत. सातत्याने रॅली, सभा, कोपरा सभा आणि बैठकांचे सत्र सुरु आहे. सततचा प्रवास आणि ताण यांमुळे त्यांना अशक्तपणा जाणवत होता. दरम्यान, कुमारस्वामी यांनी कार्यकर्त्यांना काळजी न करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, लवकरच आपण निवडणूक प्रचारात सक्रीय होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.