शिरोळ नगरपरिषद निवडणूक:  २१ ला मतदान, २२ ऑक्टोबरला मतमोजणी
प्रतिकात्मक प्रतिमा Photo credits: PTI)

कोल्हापूर: शिरोळच्या इतिहासात आणखी एका महत्वपूर्ण घटनेची नोंद होणार आहे. येत्या २१ ऑक्टोबरला शिरोळ नगरपरिषदेसाठी मतदान पार पडणार आहे. शिरोळ नगरपरिषद नवनिर्मित आहे. त्यामुळे शिरोळ नगरपरिषदेअंतर्गत येणारे नागरिक नगरपरिषद निवडणुकीसाठी म्हणून प्रथमच मतदान करणार आहेत. या निवडणुकीसाठी ११ सप्टेंबरपासून अचारसंहिता लागू झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली आहे.

एक अध्यक्ष आणि इतर १७ सदस्य

या वेळी बोलताना सहारिया म्हणाले, शिरोळ नगरपरिषदेसाठी एक अध्यक्ष आणि इतर १७ सदस्य असतील. या सर्व पदांसाठई ही निवडणूक होत आहे. निवडणुकीच्या उमेदवारीसाठी २४ ते २९ सप्टेंबर या काळात उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तर, उमेदवारी अर्जांची छाननी १ ऑक्टोबर २०१८ या दिवशी होईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पार पडेल. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.

मतदान कधी?

२१ ऑक्टोबरला सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या कालावधीत मतदान पार पडेल. तर, २२ ऑक्टोबरला सकाळी १० वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल.