भारताचे 46वे माजी सरन्यायाधीश रंजन गोगई (Ranjan Gogoi) यांचा कार्यकाळ रविवारी संपला. त्यानंतर आता सरन्यायाशीधाचा पुढील कारभार न्यायाधीश शरद बोबडे (Sharad Bobde) सांभाळणार आहेत. शरद बोबडे या पदाचा कारभार सांभाळण्यापूर्वी त्यांचा आज (18 नोव्हेंबर) शपथविधी पार पडणार आहे. त्याचसोबत शरद बोबडे हे 47 वे भारताचे सरन्यायाधीश ठरणार आहेत. न्यायाधीश शरद बोबडे यांनी देशातील अनेक ऐतिहासिक आणि महत्वाचे निर्णय दिले आहेत. तर नुकत्याच सुप्रीम कोर्टाने सुनावलेल्या अयोध्या प्रकरणीच्या निकालावेळी सुद्धा त्यांचा रंजन गोगई यांच्या खंडपीठात सहभाग होता.
मराठमोळे शरद बोबडे आज सरन्यायाशीध पदाचा कारभार स्विकारणार आहेत. तर बोबडे हे रंजन गोगई यांच्यानंतर पुढील सरन्यायाधीशाचे कामकाज सांभाळणार आहेत. 1978 मध्ये त्यांनी काउंसिल ऑफ महाराष्ट्र मध्ये समील झाले. त्यानंतर बॉम्बे हायकोर्टच्या नागपूर बेंच मध्ये लॉ ची प्रॅक्टीस केली. 1998 मध्ये वरिष्ठ वकिलांचा कारभार सांभाळला. तर 2000 मध्ये त्यांनी बॉम्बे हायकोर्टात त्यांनी अतिरिक्त न्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर ते मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले आणि 2013 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला. न्यायमूर्ती एस. ए. बोबडे 23 एप्रिल 2021 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत.(Ayodhya Verdict: अयोध्या प्रकरणी ऐतिहासिक सुनावणी करणाऱ्या 'या' 5 न्यायाधिशांबाबत जाणून घ्या)
ANI Tweet:
Justice Sharad Arvind Bobde (in file pic) will take oath as the next Chief Justice of India (CJI), today. He will be administered the oath of office of Chief Justice of India by President Ram Nath Kovind. pic.twitter.com/g1nn9i7ecO
— ANI (@ANI) November 18, 2019
यापूर्वी न्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूड यांनी सरन्यायाधीश पदाचा कारभार सांभाळला होता. चंद्रचूड यांनी 7 वर्ष 4 महिने सरन्यायाधीश पदावर कार्यरत होते. तर नुकतेच रंजन गोगई यांनी 13 महिने सरन्यायाधीश पदाचा कारभार सांभाळल्यानंतर 17 नोव्हेंबरला सेवानिवृत्त झाले आहेत.