Rape Case: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, बलात्कारादरम्यान व्हिडीओ काढून केलं सहा महिने शोषण
Girl | File Photo

13 वर्षीय मुलीबरोबर माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर नराधमानं लैंगिक अत्याचार करत दरम्यान तिचा व्हिडीओ (Video) रेकॉर्ड केला. तसेच मुलीने संबंधीत घटना कुणाला सांगितल्यास हा व्हिडीओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी दिली. व्हिडीओचा धाक दाखवत नराधमान मुलीचं तब्बल सहा महिने शोषण केलं. संबंधीत आरोपी मुलीचा शेजारी असुन मुलीच्या कुटुंबाचा तो परिचयाचा होता. पिडीत मुलगी सातव्या वर्गात शिकत असुन सध्या ती खुप घाबरलेल्य अवस्थेत आहे. सदर घटना छत्तीसगढच्या (Chhatisgarh) बिलासपूर (Bilaspur) मधली असुन संबंधीत तपास सुरु आहे.

 

आरोपीवर कलम 376 आणि पोक्सो कायद्यानुसार (POCSO ACT) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असला तरी सरकंडा (Sarkanda) पोलिस प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. सहा महिन्यापूर्वी मुलाच्या घरी कुणीही नसताना आणि तो घरात एकटा असताना त्याने संधी साधून मुलीला घरी बोलावले. यादरम्यान त्याने तीला ब्लू फिल्म (Blue Film) दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तसेच लैगिक शोषण करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड (Record) करून पिडीतेला ब्लॅकमेल (Blackmail) करण्यास सुरुवात केली. ( हे ही वाचा :-Viagra Overdose: व्हियग्रा घेणं पडलं महागात, पुरुषत्व सिध्द करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव)

 

दोन दिवसांपूर्वी तरुणाने पिडीतेला धमकावून पुन्हा त्याच्या  घरी येण्यास सांगितले. व्हिडीओच्या धाकापोटी घाबरलेली मुलगी पुन्हा त्याच्या घरी गेली. पिडीतेच्या मोठ्या बहिणीला संबंधीत प्रकाराची शंका आली. त्यामुळे तिने धाकट्या बहिणीस म्हणजे पिडीतेस विचारपूस केली असता तिने घडलेल्या प्रकारबद्दल माहिती दिली. त्यानंतर मोठ्या बहिणीने संबंधीत प्रकाराची माहिती देण्यासाठी सरकंदा पोलीस ठाणे गाठत आरोपी विरुध्द एफआयआर नोंदवली.