सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरला; निफ्टी १०६५०च्या आसपास
Stock Market (Archived images)

शेअर बाजारात आज ३०० अंकांची घसरण पाहायला मिळाली. बाजार थांबला तेव्हा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १ टक्क्यापपर्यंतची तूट झाली. बाजार बंद झाला तेव्हा, निफ्टी १०,६६०च्या आसपास पोहोचला आणि सेन्सेक्स ३५,५००वर बंद झाला. प्राप्त माहितीनुसार, बीएसईच्या ३० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स सेन्सेक्स ३०० अंक म्हणजेच ०.८टक्क्यांनी घसरुन ३५, ४७४.५ वर बंद झाला. तर, एनएसईचा ५० शेअर्सवाला प्रमुख इंडेक्स निफ्टी १०७ अंकांनी म्हणजेच १ टक्क्याने घसरत १०,६५६वर बंद झाला.

शेअर बाजार मंगळवारी सुरु झाला तेव्हा, सेन्सेक्स ४४.११ अंशांच्या घसरणीसोबत ३५,७३०. ७७ अंकांनी सुरु झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)च्या ३० कंपन्यांच्या शेअर्सवर आधारीत निफ्टी २३.३ अंशांच्या घसरणीसोबत १०,७४०.८५ अंकांनी सुरु झाला. सोमावारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स ३१७.७२ अंश म्हणजेच ०.९०च्या वाढीने ३५,७७४.८८ तर, निफ्टी ८१.२० म्हणजेच ०.७६ टक्क्यांच्या वाढीने १०,७६३.४० वर होता.(हेही वाचा, अर्थसल्ला: स्टॉक मार्केटच्या तुलनेत म्युच्युअल फंडात गुंतवणूक किती सुरक्षित..?)

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात होत असलेल्या सातत्याने बदलाचे पडसाद शेअर मार्केटवर होत आहेत. त्यामुळे येत्या काही काळात शेअर बाजारात हे चढ उतार कायम राहतील असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.