सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) अर्थात सेबी (SEBI) ने एलआयसी कर्मचार्यासह पाच संस्थांना सिक्युरिटीज मार्केटमधून प्रतिबंधित केले. शिवाय त्यांना झालेल्या 2.44 कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा सुद्धा जप्त केला. सरकारी मालकीची विमा कंपनी असलेल्या एलआयसीमधून या संस्थांना प्रतिबंधित केल्यानंतर सेबीने इतर कोणत्याही प्रकार, मार्गे सुरु असेलेल फसवे व्यापार, व्यवहार आणि गुंतवणूक थांबविण्यास सांगितले.
सेबीने प्रतिबंधित केलेल्या पाच संस्था खालीलप्रमाणे-
- योगेश गर्ग
- सरिता गर्ग
- कमलेश अग्रवाल
- वेद प्रकाश HUF
- सरिता गर्ग HUF
वरील संस्थांपैकी योगेश गर्ग हा एलआयसी गुंतवणूक विभागात काम करत होता. त्याच्याद्वारे विमा कंपनीचे व्यवहार चालत. तर सरिता गर्ग ही त्याची सासू आहे. हे सर्व लोक एकमेकांचे नातेवाई किंवा स्नेही आहेत. (हेही वाचा, Pune Fraud: पुण्यामध्ये विमा एजंट असल्याचे भासवून 55 वर्षीय महिलेची 7 लाख रुपयांची फसवणूक)
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, गर्ग यांची गुंतवणूक विभागातून दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे. योगेश गर्ग अजूनही व्यावसायिकरित्या एलआयसीशी संबंधित आहेत. योगेश गर्ग यांची कंपनीच्या गुंतवणूक विभागातून विमा कंपनीच्या दुसऱ्या विभागात बदली करण्यात आल्याची माहिती एलआयसीकडून सेबीला देण्यात आली आहे. पाच संस्था कौटुंबिक संबंध, सामायिक पत्ता आणि सामायिक फोन नंबरद्वारे एकमेकांशी जोडलेले आहेत.
सेबीला असे आढळून आले की योगेश गर्ग, LIC मध्ये डीलर असल्याने, LIC च्या येऊ घातलेल्या आदेशांबद्दल गैर-सार्वजनिक माहिती त्याला ज्ञात होती आणि त्याने माहिती वाहक म्हणून काम केले. एलआयसीच्या गैर-सार्वजनिक माहितीच्या आधारे व्यापार करण्यासाठी त्याने, प्रथमदर्शनी, दिवंगत वेद प्रकाश गर्ग यांच्या खात्याचा वापर केला आहे. इतर चार संस्थांच्या संदर्भात, ते किंवा त्यांची खाती एलआयसीच्या समोर चालणार्या व्यापारांमध्ये प्रथमदर्शनी महत्त्वाची भूमिका बजावत होती.