Yes Bank (Photo Credits: File Photo)

आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेला तारण्यासाठी एसबीआय पुढे आली आहे. त्यानुसार एसबीआय आता येस बँकेत 7250 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून त्यांना यासाठी परवानगी मिळाली आहे. केंद्रीय कॅबिनेटची बैठक पार पडल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी काही महत्वांच्या निर्णयाची घोषणा केली आहे. त्यानुसार एसबीआय येस बँकेत 49 टक्के भागीदारी करणार आहे. तसेच एसबीआयला 10 रुपये प्रति शेअर या दराने येस बँकेचे 725 कोटी शेअर खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

एसबीआय हे येस बँकेत 3 वर्षांसाठी 26 टक्क्यांपेक्षा अधिक भागीदारी करु शकत नाही. तसेच एसबीआयसह अन्य खासगी गुंतवणूकदार सुद्धा येस बँकेत गुंतवणूक करण्यास पुढे येणार आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेप्रकरणी अर्थ मंत्रालयाकडून एक नोटिफिकेशन लवकरच जारी करण्यात येणार आहे. तर नोटिफिकेशन जाहीर केल्यानंतरच्या 3 दिवसांमध्ये येस बँकेवरील निर्बंध हटवण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत 7 दिवसाच्या आतमध्ये बँकेच्या नवीन बोर्डाची नियुक्ती करण्यात येणार आहे.(Yes Bank Crisis: येस बॅंकेकडून ग्राहकांना मोठा दिलासा! आता एटीम मधून पैसे काढता येणार असल्याची दिली माहिती)

दरम्यान, येस बँकेचे ( संस्थापक राणा कपूर (Rana यांना 8 मार्च सकाळी अटक करण्यात आली. त्यानंतर राणा यांना ईडीने विशेष पीएमएल कोर्टत सादर केले. तर कोर्टाने निर्णय देत त्यांना 11 मार्च पर्यंत ईडीच्या तुरुंगात पाठवणी केली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 31 तास राणा यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. राणा यांना कोर्टात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. राणा कपूर यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आले आहे.