सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या आंधळी गावात दुहेरी हत्याकांड घडले आहे. या हत्याकांडाने गाव आणि परिसरात घबराटीचे वातावरण पहायला मिळत आहे. गावात राहणाऱ्या पती-पत्नीचा शेतात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
अधिक माहितीनुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असणाऱ्या आंधळी गावात दुहेरी हत्याकांड घडला आहे. यामध्ये पती-पत्नीचा मृतदेह शेतामध्ये रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. संजय रामचंद्र पवार आणि त्यांच्या पत्नी मनीषा संजय पवार असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव असून त्यांचे आंधळी गावतच घर आहे. दरम्यान या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. (हेही वाचा - राजगडावर पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला, चार जण गंभीर जखमी)
रात्री आपल्या शेतांना पाणी देण्यासाठी हे दाम्पत्य घरातून बाहेर पडले होते. यावेळी अज्ञात व्यक्तीकडून या दोघांवर धारदार शस्त्राने हल्ला केला. या दोघांच्या डोक्यात आणि मानेवर धारदार शस्त्राने हल्ला करून या दोघांची हत्या ही करण्यात आली. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. सकाळी गावकऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. तसंच, दाम्पत्याचा खून का करण्यात आला, याचे कारण देखील अद्याप स्पष्ट झाले नाहीये. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. मात्र, शेतातच हत्या करण्यात आल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.