Sarkari Naukri 2020: रेल्वेत 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit: PTI)

जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण रेल्वेत 10 वी पास झालेल्या उमेदवरांसाठी नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दिल्ली DSSSB Recruitment यांनी ज्युनिअर स्टेनोग्राफर, ज्युनिअर असिस्टंटसह अन्य पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी 12 वी पास उमेदवार सुद्धा अर्ज करु शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी खुल्या वर्गासाठी 100 रुपये आणि महिलांना आणि SC/ST वर्गासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारिख 27 फेब्रुवारी 2020 ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना या नोकर भरती बाबत अधिक माहिती हवी असल्यास त्यांनी येथे क्लिक करा.

तसेच रेल्वे भरती बोर्डाकडून विविध विभागात रिक्त पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. ईस्टर्न रेल्वे विभागात कोलकाता येथे ट्रेड अपरेंटिस अंतर्गत 2792 पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. रेल्वे भरती बोर्ड यांच्याकडून जाहिर करण्यात आलेल्या नोटिस नुसार, 14 फेब्रुवारी 2020 पासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. 10 वी उत्तीर्णसह 50 टक्के गुण आवश्यक असल्याचे अर्जदारांना नमूद करण्यात आले आहे. उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्ष दरम्यान असावे. खुल्या वर्षासाठी 100 रुपये आणि महिला, SC/ST वर्गासाठी अर्ज निशुल्क पद्धतीने भरता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारिख 13 मार्च 2020 ठेवण्यात आली आहे.(7th Pay Commission: सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय पोस्ट कर्मचार्‍यांच्या पगारात 'आउटस्टेशन अलाउंसेस' मध्ये वाढ होण्याची शक्यता)

DRDO Recruitment 2020 अंतर्गत रिक्त पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले असून त्यामध्ये फिटर, टर्नर, टूल अॅन्ड डाय मेकर, इलेक्ट्रिशनसह अन्य पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 6 मार्च 2020 आहे. इच्छुक उमेदवारांना याची अधिक माहिती त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.