2016 पासून लागू करण्यात आलेल्या सातव्या वेतन आयोगानंतर देशभरातील केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात भरघोस वाढ झाली आहे. दरम्यान आता पोस्ट ऑफिस कर्मचार्यांसाठी एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लवकरच केंद्र सरकारच्या पोस्ट ऑफिसमधील रेल्वे लाईन्सच्या आरएमएस विभागात काम करणार्या कर्मचार्यांना ट्रॅव्हल अलाऊंस वाढणार आहे. दरम्यान मागील काही दिवसांपासून प्रवासी भत्ता बंद झाल्याने पोस्ट ऑफिस विभागातील कर्मचारी मागील काही दिवसांपासून या विरोधात निदर्शनं करत आहेत. दरम्यान जुलै 2017 पासून हा भत्ता बंद करण्यात आल्याने कर्मचारी नाराज होते. 7th Pay Commission: देशभरातील केंद्रीय कर्मचार्यांना मोदी सरकार लवकरच देणार पगारवाढ; 10,000 रूपयांपर्यंत होऊ शकते वाढ.
दरम्यान केंद्र कर्मचार्यांना हा प्रस्तावित वाढीव भत्ता 6 तासांपेक्षा ड्युटीवर असणार्यांसाठी मिळणार आहे. जर एखाद्या कर्मचार्याने 6 तासांपेक्षा अधिक वेळ काम केल्यास 62 रूपयांवरून 71 रूपये प्रति महिना यानुसार दिला जाणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती कर्मचार्यांना त्यांच्या विभागातून दिली जाणार आहे.
केंद्रीय कर्मचार्यांना 1 जुलै 2017 पासून अलाऊंस भत्ता एरियर्सच्या स्वरूपात दिली जाईल. मागील अनेक वर्षांपासून या मागणीसाठी कर्मचारी आक्रमक होते. दरम्यान हा निर्णय 2019 लोकसभा निवडणूकींपूर्वीच होण्याची शक्यता होती मात्र सातत्याने हा निर्णय पुढे ढकलला गेला आहे. अखेर काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने या बाबत सकारत्मक निर्णय घेतला असून लवकरच त्याचा थेट फायदा केंद्रीय कर्मचार्यांना मिळणार आहे.
प्रवास भत्ता मध्ये वाढ करण्यासोबतच केंद्रीय कर्मचारी जानेवारी 2020 पासून होणार्या महागाई भत्ता वाढीच्या प्रतिक्षेत आहेत. सोबतच ग्रुप डी कर्मचार्यांनाही किमान वेतनात वाढ करावी या मागणीचा रेटा वाढवला आहे. मात्र मोदी सरकारच्या कॅबिनेट बैठकीत त्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.