रॉबर्ट वाड्रा यांची रस्त्यात घडली भविष्य सांगणाऱ्या गाईशी भेट, फेसबुक पोस्टद्वारा शेअर केला 'हा' अनुभव  (Watch Video)
Robert Vadra Shares Facebook Post With Sacred Cow (Photo Credits: Facebook)

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्यासमवेत त्यांचे यजमान रॉबर्ट वाड्रा (Robert Vadra)  यांच्या नावाची देखील बरीच हवा झाली होती. ही मंडळी आपल्या सोशल मीडियावरील सक्रिय सहभागाने नेहमीच चर्चेचा विषय ठरली होती, हीच ओळख पुढे नेत आजही व्यवसायिक वाड्रा यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक हटके पोस्ट लिहिली आहे., खरतर सकाळी सहज म्हणून फेरफटका मारायला गेले असताना त्यांची एका भविष्य सांगणाऱ्या गायीशी भेट घडली असे सांगत त्यांनी भारत व भारतीय संस्कृती किती महान आहे यावर आपले मत मांडले आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी या गायीसोबतचा एक व्हिडीओ सुद्धा आपलट्या पोस्टमध्ये शेअर केला आहे. चला तर मग पाहुयात हे नेमकं प्रकरण नेमकं होत काय?

रॉबर्ट वाड्रा यांनी आपल्या पोस्ट मध्ये आज सकाळी फिरायला गेले असताना आलेला अनुभव मांडताना भारतीय संस्कृती किती महान व वैविध्यपूर्ण आहे याचे दाखले दिले आहेत. इथे तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, विविध लोकांना भेटू शकता, त्यांची मदत करू शकता, त्यांच्या चेहऱ्यावरील एक निखळ हास्य आणि बदल्यात मिळालेली गुलाबाची फुलं हे अतिशय सुंदर गिफ्ट आहे असे ते म्हणाले. इतकेच नवे तर याच पोस्ट मध्ये त्यांनी आपल्याला भेटलेल्या भविष्य सांगणाऱ्या गायीचा सुद्धा उलेख केला आहार, ही गाय तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मान हलवून देते आणि त्यातून तुम्ही आपले भविष्य जाणून घेऊ शकता, .इतक्या वैविध्य पूर्ण देशात प्रेम आणि विश्वास हा नात्यांचा गाभा आहे असेही ते म्हणाले आहेत.

रॉबर्ट वाड्रा फेसबुक पोस्ट

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रॉबर्ट वाड्रा हे स्वतः गायीला गोंजारत पुजाऱ्यांशी बोलत आहेत. गाय योग्य उत्तर देईल का या त्यांच्या प्रशाला दुजोरा देत पुजारी सुद्धा श्रावणाच्या पवित्र महिन्यात गाय सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देते असे सांगितले आहे. वास्तविकता हिंदू संस्कृतीत गाईला देवासमान स्थान आहे, पण म्हणून गाय तुमचे भविष्य वर्तवू शकते असा कोणताही पुरावा आजवर समोर आलेला  नाही, असं असलं तरी या पोस्टमुळे वाड्रा यांची पुन्हा एकदा चर्चा झाली हे नक्की!