Kerala मध्ये Raw Egg Mayonnaise वर बंदी
Raw Egg Mayonnaise | PC: Pixabay.com

मागील काही दिवसांतील फूड पॉयझनिंगच्या (Food Poisoning) घटना पाहता Bakers Association Kerala कडून संपूर्ण केरळ (Kerala) मध्ये Raw Egg Mayonnaise वर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता केरळ मध्ये कोणत्याही रेस्टॉरंट, हॉटेल, धाब्यावर कच्च्या अंड्याचा समावेश असलेले मेयॉनिज मिळणार नाही. त्याऐवजी व्हेज मेयॉनिज किंवा Pasteurized Eggs पासून बनवलेले मेयॉनिज वापरता येईल.

Health Minister Veena George यांनी हॉटेल, रेस्टॉरंट, बेकरी असोसिएशनच्या लोकांसोबत एक बैठक घेत फूड सेफ्टी बाबत काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा केली आहे. त्यामध्ये आरोग्यांच्या दृष्टीने पाहता फूड सेफ्टीकडे कटाक्षाने लक्ष देण्याची बाब त्यांनी अधोरेखित केली आहे. अन्नपदार्थ पार्सल म्हणून देताना त्यावर एक्सपायरी डेटचं स्टिकर असणं आवश्यक आहे. सार्‍या अन्न विक्रेत्यांनी रजिस्ट्रेशन करणं, लायसंस घेण आवश्यक आहे. तसेच सार्‍यांनी food safety department’s toll free number देखील स्पष्ट दाखवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. अन्न विकलं जाणारी जागा लहान, मोठी आहे ही बाब नगण्य आहे पण तेथील स्वच्छता महत्त्वाची आहे.

मेयॉनिज हे तेल, अंड्यातील पिवळ बलक आणि अ‍ॅसिड, व्हिनेगर किंवा लिंबाचा रस यांचे मिश्रण असते. केरळमध्ये, हे श्वार्मा, अल-फहम आणि कुझीमंडी सारख्या अरबी पदार्थांसह दिले जाणारे लोकप्रिय ड्रेसिंग आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंटच्या सर्व प्रतिनिधींनी त्यांच्या सहकार्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सची स्वच्छता तपासण्यासाठी अधूनमधून तपासणी करणारी विशेष टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यालाही सार्‍यांनी मंजुरी दिली आहे.