Ranveer-Allahbadia । Insta

युट्युबर रणवीर अल्लाहबादीया (Ranveer Allahbadia) च्या एका वादग्रस्त विधानानंतर त्याच्यावर टीकेची झोड उठवली जात असताना आता त्याने सोशल मीडीयात एक व्हिडीओ पोस्ट करत माफी मागितली आहे. "India's got latent मध्ये मी जे बोललो ते मी बोलायला नको होते. मला माफ करा. माझी टिप्पणी केवळ अयोग्य नव्हती, ती मजेदारही नव्हती. कॉमेडी करणं हे मला जमत नाही, मी फक्त सॉरी म्हणण्यासाठी आलो आहे." असे म्हणत त्याने कोणतेही स्पष्टीकरण न देता थेट माफी मागितली आहे. दरम्यान पोलिसांनी मधील त्याचा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर तात्काळ कारवाईला सुरूवात केली आहे. रणवीर सह 2 जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

रणवीरने व्हिडिओ मेसेज मध्ये वायरल क्लिप मधील आक्षेपार्ह गोष्टी टाळण्याचा आणि त्या क्लिप्स हटवण्याची देखील संबंधित चॅनेल कडे विनंती केल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी खार मध्ये शीटिंगच्या स्थळी पोलिसही पोहचल्याचं समोर आलं आहे. YouTube Controversy: रणवीर अलाहबादिया आणि समय रैना यांच्याविरोधात तक्रार; आई-वडिलांमधील लैंगिक संबंधाबाबत वक्तव्य भोवले. 

रणवीर अलाहबादियाने व्हिडिओ मध्ये सांगताना त्याला अशाप्रकारे प्लॅटफॉर्म वापरला जातो का? असे अनेकांनी विचारलं आहे. "मला हे कसे वापरायचे आहे हे माहित आहे. जे काही घडले त्यामागे मी कोणताही संदर्भ किंवा औचित्य किंवा तर्क देणार नाही. मी येथे फक्त माफी मागण्यासाठी आलो आहे. माझ्याकडून वैयक्तिकरित्या निर्णय घेण्यात चूक झाली होती. ते माझ्याकडून चांगले नव्हते," असे तो म्हणाला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरला फटकारलं आहे . "मला याबाबत माहिती देण्यात आली आहे, तरीही मी अद्याप ती क्लिप पाहिली नाही. मला कळले की त्याचे वक्तव्य अतिशय अश्लील होते आणि हे चुकीचे होते. प्रत्येकाला भाषण स्वातंत्र्य आहे, परंतु जेव्हा आपण दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण करतो तेव्हा हे स्वातंत्र्य संपते. प्रत्येकाच्या मर्यादा आहेत, जर कोणी ते ओलांडले तर कारवाई केली जाईल," असे मुख्यमंत्री म्हणाले.