Naxalite Malla Surrenders On Raksha Bandhan (Photo Credits: ANI)

आज रक्षाबंंधनाचा (Raksha Bandhan 2020) पवित्र सण देशभर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बहीण भावाच्या सुंंदर नात्याचा सोहळा म्हणुन या सणाकडे पाहिले जाते. लहान मोठ्या कोणत्याही बहिणी आपल्या भावाकडुन आजच्या दिवशी गिफ्टस लुटुन लाड पुरवुन घेतात, भाऊ सुद्धा वर्षातुन एकदा येणार्‍या या खास दिवशी आपल्या बहिणीच्या सगळ्या इच्छा पुर्ण करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रयत्न छत्तीसगढ (Chhatisgarh) मधील एका नक्षलवाद्याने (Naxalite) सुद्धा केला आहे. छत्तीसगढ मध्ये अनेक नक्षली कारवायांमध्ये पुढारीवर असणारा 22 वर्षीय नक्षल कमांडर मल्ला याने रक्षाबंंधनाच्या मुहुर्तावर आपल्या बहिणीच्या सांंगण्यावरुन पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं आहे. या मल्लाच्या अटकेसाठी थोडे नव्हे तर एकुण 8 लाखांंचे बक्षिस होते, मात्र बहिणीने सांंगितले म्हणुन त्याने रक्षाबंंधन भेट रुपात पोलिसांकडे स्वतः जाऊन सरेंडर केल्याचे समजतेय.

Happy Raksha Bandhan 2020 Messages: रक्षाबंधनाच्या मराठी शुभेच्छा Wishes, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन राखी पौर्णिमेचा आनंद करा द्विगुणित!

पोलिसांच्या माहितीनुसार, मल्ला याने आत्मसमर्पण करताना दांतेवाडा पोलिस स्थानकात आपल्या बहीणी कडुन राखी बांंधुन घेतली. या क्षणाचे काही फोटो ANI या वृत्त संस्थेने शेअर केले आहेत. मल्ला रक्षाबंंधनासाठी तब्बल 12 वर्षाने आपल्या घरी परतला आहे. मल्लाच्या आत्मसमर्पणानंतर प्रोत्साहित होऊन, इतर काही बहिणींंनी सुद्धा आपल्या नक्षलवादी भावंंडांंना रक्षाबंधनासाठी घरी परत येण्यास सांगण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

ANI ट्विट

दरम्यान, मल्ला हा नक्षलवादी संघटनेचा डेप्युटी कमांडर होता, पोलिसांवर हल्ला केल्याच्या अनेक घटनांमध्ये तो सुद्धा नक्षली हल्लेखोरांचा पुढारी होता, या हल्ल्यांमध्ये अनेक पोलिसांनी आपले प्राण सुद्धा गमावले आहेत. अशावेळी त्याच्या अटकेसाठी 8 लाखाचे बक्षिस सुद्धा ठेवण्यात आले होते.