![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/01/Rape-1-784x441-380x214.jpg)
राजस्थान (Rajashtan) मधील एका विवाहित महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याचसोबत महिलेवर बलात्कार केल्याच्या व्हिडिओसुद्धा या नराधामांनी सोशल मीडियात व्हायरल केला. या प्रकरणी चार जणांचा अटक केली असून अद्याप एका आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.
विवाहित महिला तिच्या मित्रासोबत मंदिरात जात होती. त्यावेळी पाच जणांनी या दोघांना वाटेत अडवत महिलेवर बलात्कार करण्यात आला आल्याचा प्रकार घडला आहे. पाच जणांनी या महिलेवर आळीपाळीने बलात्कार करत त्याचा व्हिडिओसुद्धा बनवला. तसेच बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला.(मदरसामध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास अटक; एकेकाळी स्वतःवरही झाले होते अत्याचार)
परंतु या घटनेतील चार आरोपींना अटक केली असून पाचव्या आरोपीचा तपास सुरु आहे. तसेच पीडित महिलेला वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.