rape | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Rajasthan Rape Case: इयत्ता दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर 19 वर्षीय शाळकरी मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. ही घटान राजस्थान राज्यातील बारन जिल्ह्यात घडल्याचे समजते. पीडिता खासगी शिकवणीसाठी निघाली असता मोटारसायकलवरुन आलेल्या आरोपीने तिला उचलून नेले आणि तिच्यावर बालात्कार केल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना शनिवारी (16 सप्टेंबर) रोजी घडली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक केल्याचे वृत्त आहे.

प्राप्त माहितीनुसार, विक्रम असे आरोपीचे नाव आहे. तो पीडितेच्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. पीडितेला उचलून नेल्यावर तो तिला आपल्या किशोरवयीन मित्राच्या घरी घेऊन गेला. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे आरोपी हे कृत्य करत असताना त्याचे दोन मित्र बाहेर पाहारा देत होते. राजस्थान पोलिसांनी सांगितले की, पीडितेने माहिती देताना सांगितले की, विक्रम आणि त्याचा मित्र चंद्र प्रकाश यांनी शिकवणीला जात असताना दुपारी तीनच्या सुमारास तिल अडवले. पीडितेला घेऊन ते रामनगरमधील दुसर्‍या मित्राच्या घरी गेले. जिथे विक्रमने तिच्यावर बलात्कार केला आणि ही घटना इतर कोणाला सांगू नकोस अशी धमकी दिली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पीडितेने माहिती देताना सांगितले की, विक्रमने तिच्यावर बालात्कार केला. तसेच, दोन मित्र घराबाहेर पाहारा देत होते. पण त्यांची नावे तिला माहित नाहीत. पोलिसांनी तापस सुरु केला असून लवकरच मुख्य आरोपीला ताब्यात घेतले जाईल, असले पोलीस म्हणाले.

बलात्कार हा एक जघन्य आणि गुन्हेगारी कृत्य आहे. ज्यात एखाद्या व्यक्तीच्या संमतीशिवाय लैंगिक संबंध किंवा दुसर्‍या व्यक्तीवर लैंगिक जबरदस्ती करणे समाविष्ट आहे. बलात्कार हे एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक स्वायत्ततेचे, वैयक्तिक सीमांचे आणि मूलभूत मानवी हक्कांचे उल्लंघन आहे.

बलात्कार हा गंभीर गुन्हा आहे.  बहुतेक देशांमध्ये तो कडक शिक्षेस पात्र आहे. त्यासंदर्भातील कायदे आणि व्याख्या वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतात.परंतु हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन म्हणून सर्वत्र ओळखले जाते. बलात्काराच्या बळींना शारीरिक दुखापत, भावनिक आघात आणि दीर्घकाळ टिकणारे मानसिक परिणाम होऊ शकतात. या गुन्ह्याचे बळी ठरलवेल्यांना समुपदेशन आणि कायदेशीर मदत यांसारखे समर्थन आणि सहाय्य,  मिळणे आवश्यक असते.