Railway Recruitment 2024: 10वी आणि 12वी उत्तीर्ण तरुणांना रेल्वेत नोकरीची संधी, जाणून घ्या अधिक माहिती
रेल्वे विभागात लवकरच रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवार या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑगस्ट आहे. ही भरती मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर येथे रेल्वे भरती सेल अंतर्गत केली जाईल. ही भरती लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी केली जाणार आहे.
12 पदांसाठी ही भरती होणार आहे. ही भरती स्काउट्स आणि गाईड्स लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी असेल. लेव्हल-1 पदासाठी उमेदवारांनी 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, तर लेव्हल-2 पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नोकरीसाठी उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. 18 ते 33 वर्षे वयोगटातील उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या नोकरीसाठी अर्ज शुल्क 500 रुपये असेल. सर्व माहिती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2024 06:06 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

