रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

सणासुदीच्या काळात किंवा सामान्य दिवसात सुद्धा रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करायचा झाल्यास प्रथम तिकिट बुकिंग करणे अत्यावश्यक असते. नाहीतर आपल्याला ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणचे तत्काळ स्वरुपातील तिकिट दिले जाते. मात्र आता रेल्वेचे तिकिट बुकिंग न झाल्यास चिंता करण्याची काहीच गरज नाही. कारण IIT, ISB आणि IIM यांच्या टीमने रेलोफाय (Railofy) नावाची एक बेवसाईट सुरु केली आहे. त्यानुसार तुमचे जर रेल्वेचे तिकिट बुक झाल्यास तुम्हाला विमानाने प्रवास करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारतात 50 हजारांपेक्षा अधिक रेल्वेच्या जागा रिकाम्या होतात.

प्रवाशांना रेलोफाय या वेबसाईट वरुन रेल्वे तिकिटांचे दर सामान्यांना परवडतील असेच असणार आहेत. जर एखाद्या प्रवाशाचे तिकिट बुक झाल्यानंतर तो प्रवास करु शकतो. मात्र तिकिट बुकिंग झाले तरीही त्याला रेल्वेने त्याच्या गंतव्य स्थानकापर्यंत 24 तासात पोहचता आले नाही तर त्यांना विमानाचे तिकिट रेल्वे तिकिटाच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे रेलोफायचे रोहन देढिया यांनी स्पष्ट केले आहे.(रेल्वे तिकिटांचा आतापर्यंतचा सर्वांत मोठा काळा बाजार; गैरव्यवहाराचे धागेदोरे परदेशात)

तसेच या बेबसाईटसच्या माध्यमातून तिकिट बुकिंग करण्यासाठी प्रवाशाला 50 ते 500 रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र हे शुल्क प्रवासी कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला जाणार आहे यावर अवलंबून आहे. जर रेल्वेचे तिकिट कन्फर्म न झाल्यास त्यांना रेलोफाय कडून विमानाचे तिकिट तत्काळ तिकिटाच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रेलोफायच्या माध्यमातून तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांच्या railofy.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता. तेथे गेल्यावर प्रवाशाला PNR क्रमांकासह अन्य गोष्टींची माहिती देणे अनिवार्य असणार आहे.