Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

लोकप्रतिनिधी कायदा, 1951 च्या कलम 8(3) नुसार संसद सदस्याला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवून त्याला किमान दोन वर्षांची शिक्षा होते, तेव्हा तो लोकप्रतिनिधी अपात्र ठरतो. राहुल गांधी यांना देखील याच नियमाच्या खाली आज (24 मार्च) लोकसभेचं सदस्यत्त्व गमावलं आहे. मोदी या आडनावावरून त्यांनी केलेल्या टीपण्णीवरून सुरत कोर्टाने 2 वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही लोकसभा सचिवालयाकडून कारवाई करण्यात आली आहे.  दरम्यान यावरून देशभरातून विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहे. राहुल गांधी यांच्यावरील ही कारवाई म्हणजे ते राहुल गांधींना घाबरतात आणि लोकशाही धोक्यात आणण्याचा प्रयत्न आहे असे कॉंग्रेस कडून सांगण्यात आले आहे. नक्की वाचा: Rahul Gandhi Guilty: राहुल गांधी यांना दोन वर्षंची शिक्षा, वरिष्ठ कोर्टात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत; 'मोदी आडनाव' टीप्पणी प्रकरण .

कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपा सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हणाले आहेत. याप्रकरणी JPC ची मागणी करणार असल्याचं म्हटलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी काल ज्या अर्थी 2 वर्षाची शिक्षा सुनावली तेव्हा यापुढे काही प्लॅन असेल त्याचा अंदाज आला होता. आज नेमकं तेच झालं आहे. मी या कृतीचा निषेध करतो. पण यामधून नरेंद्र मोदी राहुल गांधी यांना किती घाबरता हे यावरून दिसतं असं म्हटलं आहे.

नाना पटोले

काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, दिल्ली

राहुल गांधींनी अदानींवर पंतप्रधानांना प्रश्न विचारला तेव्हापासूनच त्यांनी राहुल गांधींचा आवाज दाबण्याचा हा प्रकार सुरू केला. मोदी सरकारच्या मंत्र्यांनी राहुल गांधींवर अनेकदा चुकीचे आरोप केले. राहुल गांधी यांना लोकसभेत बोलण्याची आणि बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. यावरून भाजप सरकारची लोकशाहीविरोधी आणि हुकूमशाही वृत्ती स्पष्टपणे दिसून येते अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, दिल्ली यांनी दिली आहे.

ममता बॅनर्जी 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भाजप नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाते, तर विरोधी नेत्यांना त्यांच्या भाषणासाठी अपात्र ठरवले जाते. आज आपण आपल्या घटनात्मक लोकशाहीसाठी नवा नीचांक असल्याची प्रतिक्रिया ममता बॅनर्जींनी दिली आहे. 

अखिलेश यादव

महागाई, बेरोजगारी सारख्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी जाणूनबुजून राहुल गांधी यांच्यावर करवाई करण्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

दरम्यान आता राहुल गांधी यांच्यावर पुढील कोणती कारवाई होणार हे पहावं लागणार आहे. यापूर्वी अशीच एनसीपी खासदारावरही कारवाई झालेली होती मग त्यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता पण अद्याप त्यांची कारवाई मागे घेण्यात आलेली नाही.   काल राहुल गांधी यांच्याविरोधात  कोर्टाने निकाल देताच आज 24 तासाच्या आतच लोकसभा सचिवालयाने कारवाई केली आहे.