Rahul Gandhi Guilty: राहुल गांधी यांना दोन वर्षंची शिक्षा, वरिष्ठ कोर्टात दाद मागण्यासाठी 30 दिवसांची मुदत; 'मोदी आडनाव' टीप्पणी प्रकरण
Rahul Gandhi | (Photo Credits: Twitter)

Rahul Gandhi Guilty: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत शहरातील एका न्यायालयाने बदनामी प्रकरणात (Defamation Case) दोषी ठरवले आहे. त्यांना दोन वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. त्यांना 30 दिवसांचा जामीनही मंजूर करण्यात आला असून या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सन 2019 मध्ये मोदी अडनावावरुन (Modi Surname) राहुल गांधी यांनी वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरुनच दाखल तक्रारीवरुन राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील खटल्याची सुनावणी सुरतमधील न्यायालयात सुरु होती.

राहुल गांधी यांना भारतीय दंड संहिता कलम 504 अन्वये दोषी ठरवण्यात आले आहे. या कलमाखाली जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा दंड आणि दोन वर्षांची शिक्षा असे दोन्ही होऊ शकते. राहुल गांधी यांनी सन 2019 मध्ये कर्नाटकातील कोलार येथील जाहीर सभांतून बोलताना 'सर्व चोरांचे नाव मोदीच कसे काय?' असा सवाल विचारला होता. यावर गुजरातमधील भाजप आमदार आणि गुजरातचे माजी मंत्री पुर्णेश मोदी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यातून मोदी समूहाचा अपमान केल्याचा त्यांचा दावा होता. (हेही वाचा, Rahul Gandhi Guilty: काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने ठरवले दोषी, 'मोदी आडनावा'बद्दल टिप्पणी भोवली)

ट्विट

दरम्यान, कोर्टातील निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जोरदार पोस्टरबाजी केली. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरातमधील सुरत शहरासहअनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते. सुरत कोर्टाच्या बाहेरही हे पोस्टर्स लावण्यात आले होते. खटल्याचा आज निकाल होता. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी कोर्टात प्रत्यक्ष हजर होते.