Rahul Gandhi on PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी खरे बोलत नाही, बोलूही देत नाहीत, राहुल गांधी यांचा हल्लाबोल
Rahul Gandhi | (Photo Credit: ANI)

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर हल्ला चढवला आहे. केंद्र सरकारच्या बेजबाबदारपणे कोरोना व्हायरस महामारीत सुमारे 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये सरकारने मदत म्हणून द्यायला हवे, अशी मागणी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमतून न्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्ताचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. यात दावा केला आहे की, भारतातील कोविड मृतांचे आकडे सार्वजनिक करण्याच्या डब्ल्यूएचओच्या प्रयत्नांना रोखले जात आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवताना म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: कधीच खरे बोलत नाही. इतरांनाही बोलू देत नाहीत. ते अद्यापही खोटेच बोलत आहेत की, कोरोना महामारीत ऑक्सीजनच्या कमतरतेमुळे नागरिकांचा मृत्यू झाला नाही. मी या आधीही सांगितले होते की, कोरोना काळात सरकारच्या बेजबाबदारपणामुळे पाचलाख नव्हे तर 40 लाख भारतीयांचा मृत्यू झाला. आपली जबाबदारी निभावताना मोदींनी प्रत्येक कोविड मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी चार चार लाख रुपयांची नुकसानभरपाई द्यायला हवी. (हेही वाचा, Dehradun च्या 78 वर्षीय महिलेने Rahul Gandhi यांच्या नावावर केली आपली संपूर्ण संपत्ती; कारण ऐकूण तुम्हालाही बसेल धक्का!)

भारताने जागतिक आरोग्य संघटनेच्या कोविड मृत्यूबाबत निष्कर्ष लावण्याच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित करत म्हटले की, हे गणितीय मॉडेलचा उपयोग भोगोलिक आकार आणि लोकसंख्येच्या इतक्या विशाल राष्ट्रातील मृत्यूच्या आकड्यांसाठी नाही लावता येऊ शकत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 16 एप्रिल रोजी 'इंडिया इज स्टालिंग डब्लूएओज एफर्ट्स टू मेक ग्लोबल कोविड डेथ टोल पब्लिक' नावाच्या शिर्षकाखाली एक प्रतिक्रिया दिली होती. यात म्हटले होते की, देशाने अनेक वेळा वापरल्या जाणाऱ्या कार्यप्रणालीवर जागतिक आरोग्य संस्थेला आपली काळजी सांगतली आहे. काँग्रेसने आरोप केला आहे की, सरकारने कोरोना काळात झालेल्या मृत्यूची वास्तविक आकडेवारी जाहीरच होऊ दिली नाही. मृतांच्या कुटुंबातील सदस्यांना चार लाख रुपयांची मागणीही काँग्रेसने केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार चार नव्या मृतांसोबत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या 5,21,751 लाख इतकी झाली आहे.