Rahul Gandhi | (Photo Credits: ANI)

काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनी कृषी कायदे (Farm Laws 2020) आणि शेतकरी आंदोलन (Farmers Protest) यांवरुन केंद्र सरकारला घेरले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत ज्या पद्धतीने वर्तन करत आहे त्यावर टीका करताना राहुल गांधी यांनी जोरदार हल्ला चढवला. राहुल गांधी म्हणाले, सरकारला शेतकऱ्यांना घाबरवायचे धमकावायचे आहे. पण, सरकारचे हे काम नव्हे. सरकारचे काम शेतकऱ्यांची संवाद करुन तोडगा काढण्याचे आहे. सरकारने ते करायला हवे. मी शेतकऱ्यांना चांगले ओळखतो. शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारलाच मागे हटावे लागेल. फायदा यातच आहे की, सरकारने लवकर एक पाऊल मागे येत मागे हटावे. यातच भले आहे. (Rahul Gandhi on Farmers Protest)

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले, सरकार लाल किल्ला का बंद करत आहे. सरकार शेतकऱ्यांना घाबरत आहे? शेतकरी आंदोलन करत असलेल्या ठिकाणी मार्गात अडथळे उभा करत आहे. रस्त्यांवर खिळे ठोकत आहे. सरकार यातून काय करु इच्छिते? शेतकरी सरकारचे शत्रू आहे का? सरकार शेतकऱ्यांशी संवाद काढून तोडगा का नाही काढत? असा सवालही राहुल गांधी यांनी विचारला.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यारही जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधानांनी त्यांचे कर्तव्य पार पाडावे. देशभरातील जनता आज विविध प्रश्नी त्रस्त आहेत. त्याशिवाय विद्यमान पंतप्रधान हे सरकारी संपत्ती काही मोजक्या लोकांना विकण्याचे काम करत आहे. चिनला धडा शिकविण्याऐवजी हे सरकार वेगळ्याच गोष्टी करत आहे. सरकारने अर्थसंकल्प नुकताच जाहीर केला. मात्र, या अर्थसंकल्पात संरक्षणासंबंधी काहीच तरतूद केली नाही. हे आश्चर्य आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.

कोरोना व्हायरस भारतासमोरील आजघडीचे सर्वात मोठे संकट आहे. अशा संकटाच्या काळात सर्वसामान्य जनतेच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्याऐवजी केंद्र सरकार काही लोकांनाच पैस देत आहे. असे केल्याने अर्थव्यवस्था सुधारणार नाही. त्यासाठी थेट प्रयत्न करावे लागतील असेही राहुल गांधी म्हणाले.