राहुल गांधीं च्या 'सारे मोदी चोर हैं' विधानासंदर्भातील प्रकरणात झारखंड उच्च न्यायालयाकडून दिलासा
Rahul Gandhi | (Photo Credits: Facebook)

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत 'सारे मोदी चोर है' असे विधान केले होते. या विधानाचा तीव्र निषेध करण्यात आला होता. तसेच वकील प्रदीप मोदी (Pradeep Modi) यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला होता. त्यासंदर्भात झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. पुढचा आदेश देईपर्यंत राहुल गांधी यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करु नये, असे न्यायालयाने गुरुवारी झालेल्या सुनावणीमध्ये म्हटले आहे.

निवडणुकादरम्यान प्रत्येक राजकीय पक्ष विरोधकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. त्यादरम्यान ते एकमेकांना टोमणे देखील मारतात. तसेच काहीसे राहुल गांधी यांनी लोकसभा प्रचारसभेदरम्यान केले होते. 'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्यावरुन राहुल गांधी अडचणीत सापडले होते. याप्रकरणात रांचीमध्ये राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरु आहे.

ANI चे ट्विट:

हेदेखील वाचा-  'चौकीदार चोर है' या विधानावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायलयात व्यक्त केली दिलगिरी

स्थानिक न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधींना नोटीस धाडून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. याविरोधात राहुल गांधींनी झारखंडच्या उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला आहे.

राहुल गांधीच्या या विधानाने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. तसेच अन्य स्तरावरुनही या विधानाचा तीव्र निषेध केला होता.