
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अमेरिका दौऱ्यावर निघाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प पायऊतार होऊन राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बिडेन (Joe Biden) सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांचा हा पहीलाच अमेरिका (USA) दौरा आहे. भारत, अमेरिकेसह इतर चार देशांसोबत होणाऱ्या क्वॉड परिषदेत (Quad Summit) सहभागी होण्यासाठी मोदी अमेरिका दौऱ्यावर निघाले आहेत. ही परिषद 24 सप्टेंबरला पार पडत आहे. तसेच, या परिषदेत पहिल्यांदाच क्वाड परिषदेत सहभागी होणाऱ्या राष्ट्रांचे प्रमुख समोरासमोर बसून चर्चा करणार आहेत. या परिषदेसाठी पीएम मोदी यांच्याशिवाय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन, ऑस्ट्रेलियाचे पीएम स्कॉट मॉरिसन (PM Scott Morrison) आणि जापान चे पीएम योशिहिदे सुगा (PM Yoshihide Suga) हे सहभागी होतील.
क्वॉड परिषदेत कोविड-19, प्रशांत महासागर, सायबर स्पेस आणि भविष्यातील टेक्नॉलॉजी आदी मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. व्हाइट हाउस येथे होणारी ही चर्चा भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जापान यांच्यात होईल. या बैठकीचे वैशिष्ट्य असे की पंतप्रधोना मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे पहिल्यांदाच एमकेकांना आणि तेही समोरासमोर भेटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोरोना काळातील हा दुसरा विदेश दौरा आहे. कोरोना काळात त्यांनी बांग्लादेश दौरा केला होता. त्यानंतर आता ते अमरिकेला निघाले आहेत. दरम्यान, 25 सप्टेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणही होऊ शकते. (हेही वाचा, Sansad TV: देशाला लवकरच मिळणार नवी वाहिनी; PM Narendra Modi 15 सप्टेंबर रोजी करणार 'संसद टीव्ही'चे लोकार्पण)
दरम्या, क्वाड परिषदेवर चीनच्या विरोधासाठी केलेली आघाडी अशी टीकाही केली जाते. दरम्यान, भारत आणि या परिषदेतील इतर सदस्यांनी रशीया आणि इतर देशांच्या अशा आरोपांचे खंडण केले आहे. रशीयाच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या परिषदेला एशियन नाटो असेही म्हटले होते. नाटो अमेरिकेच्या नेतृत्वात तयार झालेली यूरोपीय देशांची एक सैन्य आघाडी आहे.
एका पत्रकार परिषदेत व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी म्हटले की, क्वाड लीडर्स परिषद आयोजित केली जाईल. यात राष्ट्राध्यक्ष जो बायडेन पहिल्यांदा परिषदेला 24 सप्टेंबरला संबोधीत करतील. बायडेन या परिषदे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पीएम स्कॉट मॉरिसन आणि जापान चे पीएम योशिहिदे सुगा यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करतील.