Pulse Polio Drive: 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान देशभरात विशेष पल्स पोलिओ अभियान
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Flickr, RIBI Image Library)

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण (Pulse Polio Immunisation Drive) मोहिमेला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत पाच वर्षांपर्यंतच्या सर्व लहान मुलांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. दरम्यान, राष्ट्रीय लसीकरण दिवसाची सुरुवात 17 जानेवारीपासून होणार होती. मात्र 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरण (Covid-19 Vaccination Drive) अभियान सुरु झाल्याने पोलिओ लसीकरण मोहिमेला स्थगिती देण्यात आली. राष्ट्रीय लसीकरण दिवस पल्स पोलिओ लसीकरण या नावे चालवला जातो.

भारताच्या राष्ट्रपती कार्यालयाशी सल्लामसलत करून आरोग्य मंत्रालयाने पोलिओ लसीकरण दिन 31 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला. हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिवस किंवा पोलिओ संडे म्हणून देखील ओळखला जातो. (राष्ट्रपती भवनात 30 जानेवारीला पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार)

पल्स पोलिओ अभियानासंदर्भात महत्त्वाच्या बाबी:

# 0-5 वर्षांच्या मुलांना पोलिओ ड्रॉप्स देण्यात येतील.

# 31 जानेवारीपासून सुरु होणारे अभियान 2 फेब्रुवारीपर्यंत चालेल.

# ज्या रविवारी लसीकरण अभियान सुरु होते त्या दिवसाला राष्ट्रीय लसीकरण दिवस म्हणून मानले जाते.

# 1995 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या ग्लोबल पोलिओ निर्मूलन उपक्रमाच्या पुढाकाराने भारताने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम सुरू केला.

# पोलिओ लसीकरण अभियान वर्षातून दोनदा आयोजित केला जातो.

# कोविड-19 संकटाच्या काळात पोलिओ लसीकरण अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना लसीकरण शिबिरात न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना)

पोलिओपासून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशभरातील 0-5 वर्षातील मुलांना लसीचे दोन थेंब दिले जातात. उद्यापासून या अभियानाला सुरुवात होणार आहे.