प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Flickr, RIBI Image Library)

भारतामध्ये यावर्षी 17 जानेवारी पासून सुरू होणारी पोलिओ लसीकरण मोहिम आता 31 जानेवारी पासून सुरू करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. दरम्यान आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health & Family Welfare) त्याबाबतचे एक परिपत्रक जारी केलेले आहे. यामध्ये 31 जानेवारी 2021 हा राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिवस (Polio National Immunisation Day) म्हणून जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान त्याचा शुभारंभ 30 जानेवारीला होणार आहे. पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरूवात 30 जानेवारीला राष्ट्रपती भवनात होईल. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीमध्ये काही मुलांना पोलिओचा डोस दिला जाईल.

दरम्यान काल (13 जानेवारी) काही कारणास्तव पोलिओ लसीकरण मोहिम पुढे ढकलण्यात येत आहे अशी माहिती देण्यात आली होती. या पोलिओ लसीकरण मोहिमेमध्ये देशभरातील 0-5 वर्षातील मुलांना पोलिओ सारख्या आजाराशी सामाना करण्यासाठी बळकट करण्याच्या उद्देशाने लसीचे दोन थेंब दिले जातात. धक्कादायक! पोलिओची लस दिल्यानंतर सात महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू; पालघर जिल्ह्यातील घटना.

केंद्रीय आरोग्य मंत्रालय ट्वीट

भारतामध्ये येता शनिवार म्हणजे 16 जानेवारीपासून कोविड 19 लसीकरणाला सुरूवात होत आहे. यामध्ये कोविड योद्धे आणि आरोग्य कर्मचारी अशा पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस दिली जाईल. ही लस निशुल्क असेल. दरम्यान देशात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींना मंजुरी देण्यात आली आहे.