नक्षलवाद्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी राज्यात सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू होणार
Representational Image | (Photo Credit: PTI)

राज्यात नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांपासून बचाव करण्यासाठी लवकरच सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू होणार आहे. महाराष्ट्रासह छत्तीसगढ येथे हा कायद्याचे पालन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बातचीत केल्यानंतर या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत एनआय यांनी अधिक माहिती दिली आहे.

नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात नागरिकांसह स्थानिक मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या या कारवायांपासून बचाव करण्यासाठी सार्वजनिक सुरक्षा कायदा लागू करण्यात येणार आहेत. छत्तीगढ आणि गडचिरोली येथे मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्यांची तळी आहेत. या स्थानिक ठिकाणी बहुतांश वेळेस चकमकी झाल्याचे प्रकार सुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे आता हा कायदा लागू करण्यात येणार असल्याची माहिती नक्षलग्रस्त विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.(जवानांच्या ताफ्यावर हल्ला केल्यानंतर, बॅनर लावून नक्षलवाद्यांची धमकी; असा रचला हल्ल्याचा कट)

ANI Tweet:

तर गेल्या दोन वर्षांपूर्वी छत्तीसगड येथे सुरक्षा यंत्रणा नष्ट करण्यासाठी नक्षसवाद्यांनी नवीन शक्कल लढवली आहे. या करिता नक्षलवाद्यांनी जंगलात पुतळे उभे केले असून ते जीवंत नक्षलवादी आहेत असे जवानांना भासवून दिले होते. तसेच गडचिरोली येथे एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणूका पार पडत असताना नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात या हल्ल्यात सी-60 कमांडो पथकातील 3 जवान जखमी झाले होते.