Employees Strike | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

नव्या वर्षात बँक क्षेत्रातील प्रमुख युनियन यांनी संप पुकारणार असल्याचा इशारा दिला आहे. आयएनएस यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 8 जानेवारीला केंद्रीय ट्रेड युनियन द्वारे आयोजित संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती अखिल भारतीय बँक कर्मचारी संघाच्या वरिष्ठांनी दिली आहे. बँक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या महत्वाच्या कामावर होणार आहे.

एआयबीईएचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम म्हणाले की, देशभरात सर्वसाधारण संपाला 10 केंद्रीय कामगार संघटना पाठिंबा देत आहेत. व्यंकटचलम यांच्या म्हणण्यानुसार हा संप केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात केला जाईल, ज्यामध्ये रोजगार सुरक्षा, नोकरीनिर्मिती आणि कामगार कायद्यांमधील दुरुस्ती रोखण्यासाठी संबंधित मागण्या केल्या जातील.

वेंकटाचलम म्हणाले की या संपात सामील झालेल्या बँकिंग क्षेत्राशी संबंधित प्रमुख संघटना एआयबीईए, एआयबीओए, बीईएफआय, आयएनबीईएफ आणि आयएनबीओसी असतील. . रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) कर्मचारीही संपामध्ये सामील होतील असा दावा व्यंकटचलम यांनी केला आहे. याशिवाय सहकारी बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक (आरआरबी), भारतीय जीवन विमा महामंडळ (एलआयसी) आणि जनरल विमा क्षेत्रातील कर्मचार्‍यांनीही या संपाला पाठिंबा दर्शविला आहे.(बँकेच्या KYC फॉर्ममध्ये तुम्हाला धर्माचे नाव लिहावे लागण्याची शक्यता)

 कर्मचारी संघटना बँका विलीन करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करीत आहेत. वास्तविक, सुमारे तीन महिन्यांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 10 बँकांचे विलीनीकरण करण्याची घोषणा केली. यानंतर नवीन बँका अस्तित्वात येतील. आंध्र बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यापुढे अस्तित्त्वात राहणार नाही. तसेच या विलीनीकरणामुळे बँकिंग क्षेत्रात नोकऱ्यांवर गदा येईल असे त्यांचे म्हणणे आहे.