बँकेकडून लवकरच त्यांना केवायसी फॉर्ममध्ये एक नवा कॉलम सुरु करणार आहेत. त्यानुसार ग्राहकांना त्यांच्या धर्माबाबत माहिती द्यावी लागणार आहे. एफईएमएच्या (FEMA) नियमात बदलाव केल्यामुळेच धर्माबाबत माहिती देणे अनिवार्य असणार आहे. मुस्लिम धर्मियांव्यतिरिक्त अन्य धर्मातील नागरिकांना एनआरओ खाते सुरु किंवा संपत्ती खरेदी करण्यासाठी ही सुविधा मिळावी म्हणून हा ऑप्शन आता असणार आहे. एनआरओ भारतीयांसाठी बचत खाते सुरु करण्याची सुविधा दिली जाते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याअंतर्गत आरबीआय तर्फे 2018 मध्ये जारी करण्यात आलेल्या फेमामध्ये सुधारणा काही नागरिकांसाठी सिमित करण्यात आले आहे. त्यानुसार जे पाकिस्तान, बांग्लादेश किंवा अफगाणिस्तान मधून अल्पसंख्यांने येतात आणि लॉन्ग टर्मसाठी वीजा बाळगतात. लॉन्ग टर्म वीजा 5ठेवणारे लोक भारतात संपत्ती खरेदी किंवा बँक खाते सुरु करु शकतात. सुधारणा नियम नास्तिक, मुस्लिम, म्यानमार, श्रीलंका आणि तिबेटियन प्रवाशांसाठी नाही आहे.(सुकन्या समृद्धि योजनेच्या नियमात सरकारकडून बदल, जाणून घ्या)
फेमाच्या नियमाअंतर्गत बांग्लादेश, पाकिस्तान किंवा अफगाणिस्तान येथील अल्पसंख्यांक लोक ज्यांना भारतात लॉन्ग टर्मसाठी वीजा दिला आहे त्यांना फक्त भारतात स्थावर मालमत्ता खरेदी करता येते. त्त मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले की, हा बदल गेल्या वर्षी करण्यात आला होता, जेव्हा अनेक वित्तीय तज्ञ, नोकरशाही आणि राजकारण्यांचे लक्ष आर्थिक संकटाकडे होते. ते म्हणाले, "बँकिंगशी संबंधित नियम धार्मिक भेदभावाचे नियम आणतील अशी कोणालाही अपेक्षा नव्हती."