Omicron Variant च्या पार्श्वभूमीवर PM Narendra Modi  यांचं भारतीयांना सतर्क राहण्याचं आवाहन
PM Narendra Modi| PC: Twitter/ANI

दिल्लीमध्ये आज केंद्र सरकारचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरू झालं आहे. या अधिवेशनाला सामोरं जाण्यापूर्वी संसद भवन परिसरामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी भारतीयांना सध्या जगात चिंता व्यक्त केली जात असलेल्या ओमिक्रॉन (Omicron Variant)  या नव्या कोरोना वायरस व्हेरिएंट बाबत अलर्ट राहण्याचं आवाहन केले आहे. कोरोना संकट काळात भारताने नागरिकांना कोविड 19 लसींचा डोस देण्याचा 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे. आता आपण 150 कोटीच्या टप्प्यावर आहोत. नव्या व्हेरिएंटच्या बातम्या आता आपल्याला अधिक सतर्क करत आहेत. नागरिकांचं आरोग्य याला सरकारचं प्राधान्य असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने B.1.1.529 या नव्या कोरोना वायरस व्हेरिएंटला शुक्रवार (26 नोव्हेंबर) दिवशी 'Omicron' असं नाव देत त्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा व्हेरिएंट सर्वात प्रथम दक्षिण आफ्रिका मध्ये नोंदवण्यात आला आहे.

सध्या भारतामध्ये कोरोना संकट आटोक्यात असल्याची परिस्थिती असली तरीही नागरिकांनी आणि प्रशासनाने कोणती काळजी घ्यावी? यासाठी शानिवारी (27 नोव्हेंबर) दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी तज्ञांशी चर्चा केली आहे. तयारीचा आढावा घेतला आहे. केंद्र सरकारने त्याच्या आधारे आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. यामध्ये कोणत्या देशांपासून धोका आहे? याची देखील यादी प्रसिद्ध केली आहे. नक्की वाचा: Guidelines for International Arrivals: सरकारने जारी केल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नव्या मार्गदर्शक सुचना; सादर करावा लागेल 14 दिवसांच्या प्रवासाचा तपशील .

दरम्यान संसद भवन परिसरामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाचं अधिवेशन महत्त्वाचं आहे. सरकार सार्‍या प्रश्नांची उत्तरं देण्यास तयार आहे पण यामध्ये सभागृहाचा, अध्यक्षांचा मान राखला जावा ही अपेक्षा आहे. चर्चा देखील झाली पाहिजे आणि शांतता देखील राखता आली पाहिजे असे म्हटलं आहे. आज लोकसभा आणि त्याच्या पाठोपाठ राज्यसभा मध्ये 3 सुधारित कृषी कायदे मागे घेतले जाऊ शकतात.