
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Modi) हे आपल्या निर्णयांसोबतच आपल्या भाषणांसाठीही प्रसिद्ध आहेत. जाहीर सभेतील थेट भाषणांसोबतच त्यांनी केलेली रेडीओ, टीव्ही आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमधून केलेली भाषणेही नेहमीच गाजतात. चर्चेचा विषय ठरतात. आताही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एक भाषण जोरदार चर्चेत आले आहे. मात्र, त्यांच्या या भाषणाची चर्चा विचारांमुळे नव्हे तर भाषण करताना टेलीप्रॉऊंटर (Teleprompter) बंद पडल्याने पंतप्रधानांचा झालेला गोंधळ याबाबत आहे. या गोंधळामुळे पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा चर्चेत आले असून, सोशल मीडियावर त्यावर अनक मिम्स बनले आहेत. काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांनीही पंतप्रधानाचा नामोल्लेख टाळत टोला लगावला आहे.
नेमकं काय घडलं?
एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण ठोकत होते. या वेळी अचानक तांत्रिक अडचणींमुळे टेलीप्रॉम्पर बंद पडला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भाषण करताना पुढे एकही वाक्य बोलता आले नाही. ते गोंधून गेले. त्यांनी मध्येच आपले भाषण समोरच्यांना ऐकू येतं आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली. त्यानंतर ते काहीसे संतापले आणि संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. हाताने हेडफोन चाचपू लागले. यावरुन सध्या सोशल मीडियावर जोरदार टीका होऊ लागली आहे. (हेही वाचा, Rahul Gandhi On BJP: मोदी सरकारचं अजून एक आश्वासन ठरलं खोटं, राहुल गांधींची टीका)
घडल्या प्रकारमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगलेच गोंधळून गेले. त्यांना न अडखळता एकही वाक्य बोलता न आल्याची टीका या सर्व प्रकारानंतर होऊ लागली आहे.
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाची टीका
काँग्रेस पक्षाने नरेंद्र मोदी यांच्यावर चित्रपटातील एका संवादाचा आधार घेत टीका केली आहे. ‘हमें तो टेलीप्रॉम्प्टर ने लूटा, अपनों में कहां दम था।’, असे म्हणत काँग्रेसने #TeleprompterPM हॅशटॅग वापरत टीका केली आहे. तर राहुल गांधी यांनीही नामोल्लेख टाळत निशाणा साधला आहे. “एवढं खोटं तर टेलिप्रॉम्टरलाही पेलता आले नाही,” असं ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
ट्विट
इतना झूठ Teleprompter भी नहीं झेल पाया।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 18, 2022
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मिम्सची लाटच आली. या प्रकरणाशी संबंधीत अनेक हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होऊ लागले आहेत. यात #TeleprompterPM #Teleprompter #TeleprompterFail #TeleprompterJeevi असे काही हॅशटॅग धुमाकुळ घालत आहेत.