राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Photo Credits : Getty)

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचे उद्या (1 फेब्रुवारी) बजेट सादर केले जाणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता देशातील सर्व नागरिकांचे लक्ष यावर लागून राहिले आहे. देशाची आर्थिक मंदी पाहता उद्याच्या बजेट मधून दिलासा मिळावा याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तत्पूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलताना त्यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याचा उल्लेख केला. यावरुन विरोधी पक्षाच्या खासदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या भाषणात सीएएचा उल्लेख करत असे म्हटले की, विभाजनानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी असे सांगितले की ज्या हिंदू आणि सिख यांना पाकिस्तानात रहायचे नाही ते भारतात येऊ शकतात. त्यांना सामान्य जीवन मिळवून देणे हे भारत सरकारचे कर्तव्य आहे. कोविंद यांच्या या भाषणाने आनंदित होत केंद्रातील नेत्यांनी बाक वाजवण्यास सुरुवात केली. त्यावेळी मोदी सुद्धा उपस्थित असल्याचे दिसून आले.(Citizenship Amendment Act: 'नागरिकत्व सुधारणा कायदा देशातील कोणत्याही धर्माच्या, भागातल्या नागरिकावर विपरीत परिणाम करणार नाही')

ANI Tweet:

दरम्यान रामनाथ कोविंद यांनी सीएए वरुन केलेल्या विधानांमुळे विरोधकांनी संताप व्यक्त करत शेम शेमच्या घोषणा दिल्या. तर नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन देशभरात वादंग माजला आहे. हे विधेयक संसदेत मंजूर झाले. परंतू, संसदेबाहेर मात्र या कायद्याला प्रचंड विरोध करण्यात आला. अनेक ठिकाणी आंदोलने होत आहेत. त्यातील काही हिंसक झाली आहेत. आता या कायद्याला पाठिंबा देण्यासाठी समर्थनार्थही मोर्चे काढले जात आहेत.